नागपूर - नागपूर महानगर पालिकेने बोलावलेल्या विशेष सभेत ( Nagpur Municipal Corporation Special Meeting ) काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक सिगारेटचे झुरके ( Senior Congress Corporator Smoking ) सोडताना दिसून आले आहे. रमेश पुणेकर ( Ramesh Punekar ) असे काँग्रेस नगरसेवकाचे नाव आहे आहे. महापालिकेच्या काल (शनिवारी) पार पडलेल्या ऑनलाइन विशेष सभेत ही घटना घडली आहे.
नागपूर शहरातील कचऱ्याचा प्रश्न तसेच कचरा संकलन करणाऱ्या दोन खासगी कंपन्यांच्या कारभारा संदर्भात महापालिकेची विशेष ऑनलाइन सभा बोलविण्यात आली होती. या ऑनलाइन सभेत कचरा संकलन करणाऱ्या दोन्ही कंपन्यांच्या कारभारात संदर्भात चौकशी समितीचा अहवाल मांडण्यात आला. अहवालावर चर्चा सुरू असताना काँग्रेसचे नगरसेवक रमेश पुणेकर हे सिगारेटचे झुरके सोडताना दिसून आले. रमेश पुणेकर या सभेसाठी नाईक तलाव परिसरातील त्यांच्या कार्यालयातून ऑनलाइन सभेत सहभागी झाले होते. सभा सुरू असताना रमेश पुणेकर कॅमेऱ्यात सिगारेटचे झुरके सोडताना चित्रित झाले आहे.
- 'अनावधानाने चूक झाली'
नागपूर महानगरपालिकेची विशेष सभा ऑनलाइन होती. त्यामुळे नगरसेवक रमेश हे त्यांचा कार्यालयात बसून या सभेत सहभागी झाले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रमेश पुणेकर यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला आहे. मात्र चर्चा करताना ते म्हणाले, की ऑनलाइन सभेत माझा कॅमेरा सुरू आहे, याची मला माहिती नव्हती, त्यामुळे ही चूक झाल्याचे पुणेकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - Aurangabad Election 2022 : 'बायको पाहिजे' औरंगाबादमध्ये जागोजागी बॅनरची रंगली चर्चा, नेमकं काय प्रकरण?