ETV Bharat / city

जयंत पाटलांचा भाजपला टोला ! इथं विरोध करत बसण्यापेक्षा मोदींना भेटण्यासाठी आमच्यासोबत या...

आत्ताचे विरोधक राज्यात सत्तेत असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी अपेक्षित असे काही केले नाही. त्यामुळे सभागृहात येथे विरोध करण्यापेक्षा मोदींना भेटण्यासाठी आमच्यासोबत या, असा टोला मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला लगावला.

Jayant Patil
जयंत पाटील
author img

By

Published : Dec 17, 2019, 2:59 PM IST

नागपूर - सध्या विरोधात असलेले लोक राज्यात अवकाळी संकट आले तेव्हा सत्तेत होते. मात्र तेव्हा सत्तेत असतानाही त्यांनी शेतकऱ्यांसाठी अपेक्षित असे काहीच केले नाही. त्यामुळे सभागृहात इथे विरोध करण्यापेक्षा मोदींना भेटण्यासाठी आमच्यासोबत या, असा टोला मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला लगावला.

हेही वाचा... या देशात सामान्यांचे जगणे महाग आणि मरण स्वस्त झालंय ! शिवसेनेची केंद्र सरकारवर टीका

राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकारने 6 हजार 600 कोटी रुपये मंजूर केले आहे. त्यापैकी 2100 कोटी रूपये वितरीत करण्यात आले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी आणि पुरग्रस्तांच्या मदतीकरता राज्य सरकारने 14 हजार 600 कोटी रुपयांची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे, अशी माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत दिली.

हेही वाचा... नगराध्यक्ष अन् सरपंच जनतेतून थेट निवडण्याची पद्धत होणार रद्द..

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मागणी विरोधकांनी केल्यानंतर त्याला उत्तर देताना अर्थमंत्री जयंत पाटील बोलत होते. ते म्हणाले की, राज्य सरकारमार्फत मदतीचे वाटप सुरू आहे. मंजूर केलेल्या 6600 कोटी रुपयांपैकी 2100 कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वितरीत केले आहेत. उर्वरित रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे.

हेही वाचा... 'अच्छे दिन'बद्दल विचारल्यावर तुमची बोबडी का वळते? ; युती तुटली म्हणजे आम्ही धर्मांतर केले नाही

राज्य सरकारने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी 7400 कोटी रूपये, तर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 7200 कोटी रुपये, अशी एकूण 14 हजार 600 कोटी रुपयांची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही यावेळी अर्थमंत्र्यांनी दिली.

Intro:Body:mh_mum__asembly_jayantpatil_nagpur_7204684

इथं विरोध करण्यापेक्षा मोदींना भेटण्यासाठी आमच्यासोबत या : मंत्री जयंत पाटील यांचा भाजपाला टोमणा

नागपूर : आत्ताचे विरोधक सत्तेत असताना अवकाळी संकट आले होते. सत्तेत असताना त्यांनी काही केले नाही.
सभगृहात इथं विरोध करण्यापेक्षा मोदींना भेटण्यासाठी आमच्यासोबत या असा टोमणा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपाला हाणला. राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासनाने 6 हजार 600 कोटी रुपये मंजूर केले असून यापैकी 2100 कोटी रूपये वितरीत करण्यात आले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी आणि पुरग्रस्तांच्या मदतीकरिता राज्य शासनाने 14 हजार 600 कोटी रुपयांची मागणी केंद्र शासनाकडे केली आहे. अशी माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी आज विधानसभेत दिली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मागणी विरोधीपक्षांनी केल्यानंतर त्याला उत्तर देतांना अर्थमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, राज्य सरकारमार्फत मदतीचे वाटप सुरू आहे. मंजूर केलेल्या 6600 कोटी रुपयांपैकी 2100 कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वितरीत केले आहेत. उर्वरित रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे.

राज्य शासनाने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी 7400 कोटी रूपये तर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 7200 कोटी रुपये अशी एकूण 14 हजार 600 कोटी रुपयांची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाहीही अर्थमंत्र्यांनी यावेळी दिली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.