नागपूर - दिल्ली सीमेवर सुरू असलेल शेतकरी आंदोलन हे काही ठराविक लोकांकडून आणि काँग्रेस पक्षाकडून पेटवले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत. त्यामुळे ते रद्द होणार नाहीत, असे मत भाजप नेते व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. नागपूरात आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या आंदोलक शेतकऱ्यांच्यामते संभ्रम निर्माण करण्याचे काम काँग्रेस व इतर संघटना करत आहे, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
आंदोलन चूकीचेच -
केंद्र सरकार कडून पारित करण्यात आलेले तीनही कृषी कायदे हे शेतकऱ्यांचे हित जोपासणारे आहेत. या कायद्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड बळ मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून सुरू असलेले आंदोलन चूकीचेच आहेत. असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
कृषी कायद्यामुळे शेतकरी स्वतःच भाव ठरवेल-
या कायद्यामुळे शेतकऱ्यांना आतापर्यत मुक्त बाजारपेठांमधे आपला माल विकण्याची मुभा नव्हती. मालाची किंमत ठरविण्याचा अधिकार नव्हता. तो अधिकार या कायद्यामुळे प्राप्त होणार आहे. शिवाय स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी देखील यात असल्याने शेतकऱ्यांना अधिकच मजबूत करणारा हा कायदा आहे. अशी प्रतिक्रियांही बावनकुळे यांनी दिली. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या पाठिशी राहून त्यांना मजबूत करण्यासाठी हा कायदा पारीत केला आहे. तो रद्द होणारच नाही, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
ठराविक व्यापारी संघटना व राजकीय लोकांनामुळे शेतकरी संभ्रमीत-
त्यामुळे काही ठराविक व्यापारी संघटना असतील किंवा राजकीय पक्ष असतील यांच्या कडून सातत्याने आंदोलक शेतकऱ्यांना संभ्रमीत करून आंदोलन करण्यास प्रवृत्त करत आहेत. असा आरोपही यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. अशावेळी तीनही कृषी कायदे शेतकऱ्यांना न्याय देणारे आहेत. म्हणून या कायद्याचे समर्थन केले पाहीजे असेही बावनकुळे म्हणाले.