नागपूर - विधानपरिषद निवडणुकीत (Nagpur MLC Election Result 2021) भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे विजयी (Chandrashekhar Bawankule Won Nagpur MLC Election) झाल्याची घोषणा होताच, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Wishes Chandrashekhar Bawankule), चंद्रशेखर बावनकुळे यांना शुभेच्छा देण्यासाठी 'विजय रॅली'त (Devendra Fadnavis Vijay Rally) पोहचले. देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळे यांना शुभेच्छा देताच बावनकुळे यांनी फडणवीस यांची गळाभेट घेतली. तेव्हा बावनकुळे यांना अश्रू (Chandrashekhar Bawankule Cry News) अनावर झाले होते. तर 'मी ज्यावेळी २०१९ ची निवडणूक जिंकलो होतो, तेव्हा मला जेवढा आनंद झाला नाही, त्यापेक्षा जास्त आनंद आज होत असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Reaction On Chandrashekhar Bawankule Win) यांनी दिली.
हेही वाचा - Pravin Darekar Criticized MVA : महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांवरून जनतेचा विश्वास उडाला : प्रवीण दरेकर
- बावनकुळेंना अश्रू अनावर -
दोन वर्षे राजकीय वनवास भोगल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचे राज्याच्या राजकारणात पुनरागमन होत आहे. एक अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख आहे. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात दमदार कामगिरी केल्यानंतर सुद्धा २०१९ च्या निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली. त्यामुळे बावनकुळे नाराज झाले असल्याचे चित्र रंगल होते. मात्र, या दोन वर्षांच्या काळात पक्षा विरोधात किंव्हा पक्षातील कोणत्या ही नेत्याच्या विरोधात त्यांनी एक शब्ददेखील काढला नाही. पक्षाने दिलेली महामंत्री पदाची जबाबदारी पार पाडत असताना भाजपाने त्यांना विधानपरिषदेत पाठवून त्यांचे पुनर्वसन केले आहे. दोन वर्षानंतर आता विधिमंडळात त्यांचा आवाज घुमणार आहे. कदाचित हा वनवास संपल्याचा आनंद त्यांना आज लपवता आला नाही. त्यामुळे नकळत त्यांना अश्रू अनावर झाले होते.
हेही वाचा - MLC Election Result 2021 : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे वसंत खंडेलवाल विजयी
- बावनकुळे यांचे राजकिय पुनर्वसन -
विधानसभा निवडणुकीत बावनकुळे यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी म्हणुन बावनकुळे यांना भाजपाने महामंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. बावनकुळे म्हणजे नागपूर भाजपाचा अधिकृत आवाज समजला जातो. पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली तेव्हा भाजपला पूर्व विदर्भात मोठे नुकसान सहन करावे लागते होते. बावनकुळे यांच्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडणार, हे लक्षता आल्यानंतर भाजपाने चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानपरिषद निवडणुकीत उतरवून त्यांची नाराजी दूर केली आहे.
हेही वाचा - MLC Election Result 2021 : नागपूरसह अकोल्यातही भाजपचा विजय, काँग्रेसची मतं फुटली