ETV Bharat / city

Chandrashekhar Bawankule Criticized CM : 'विदर्भाला गारपिटीचा तडाखा बसला याची माहिती तरी मुख्यमंत्र्यांना आहे का?' - विदर्भाला अवकाळी पावसाचा फटका

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून राज्य सरकार केवळ राजकारणात व्यक्त आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विदर्भाला अवकाळी पावसाचा आणि गारपीटीचा तडाखा बसला आहे, याची कल्पना देखील देण्यात आली की नाही? अशी शंका भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे. ते आज नागपुरच्या प्रेस क्लबमध्ये बोलत होते.

भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे
भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे
author img

By

Published : Jan 12, 2022, 3:28 PM IST

Updated : Jan 12, 2022, 3:38 PM IST

नागपूर - गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण विदर्भाच्या प्रत्येक भागाला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. अनेक भागात गारपीट झाली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि फळ भाज्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र अजूनपर्यंत राज्य सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले नाहीत. कोणत्याही जिल्हाच्या पालकमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा सुद्धा केलेला नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून राज्य सरकार केवळ राजकारणात व्यक्त आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विदर्भाला अवकाळी पावसाचा आणि गारपीटीचा तडाखा बसला आहे, याची कल्पना देखील देण्यात आली की नाही? अशी शंका भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे. ते आज नागपुरच्या प्रेस क्लबमध्ये बोलत होते.

माध्यमांना प्रतिक्रिया देतांना आमदार चंद्रशेखर बावनकुळे

मागील दीड दिवसांपासून नागपूर शहरासह जिल्ह्यात आणि संपूर्ण विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार अवकाळी पावसाने आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या उभा पिकांना प्रचंड नुकसान झालेले आहे. गहू, हरभरा, भाजीपाला आणि फळबागांचे नुकसान झालेले आहे. अवकाळी पावसामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज असताना राज्य सरकार मात्र जाणीवपूर्वक या कडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.

'तत्काळ 50 हजार हेक्टरी मदत जाहीर करा'

राज्यात कुठेही अवकाळी पाऊस किंवा गारपीट झाली तर याची सूचना राज्य सरकारला दिली जाते. विदर्भाला अवकाळी पावसाने झोडपून काढल्यानंतर गारपीटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले. ग्रामीण भागात अतिशय विदारक परिस्थिती असताना सुद्धा राज्य सरकारने याची साधी दखलही घेतलेली नाही. पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी कोणत्याही हालचाली करत नाही. त्यामुळे बांधल्यावर येऊन शेतकऱ्यांना मदत करणार असल्याची भाषा बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांनीच आपला शब्द फिरवला, असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. सरकारमध्ये जराही संवेदनशीलता शिल्लक असेल तर तत्काळ शेतकऱ्यांसाठी 50 हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

हेही वाचा - Lata Mangeshkar Covid Positive : लता मंगेशकरांना कोरोनासह निमोनियाची लागण; प्रकृती स्थिर असल्याची कुटुंबाची महिती

Last Updated : Jan 12, 2022, 3:38 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.