नागपूर - दारू पिण्यासाठी जवळ पैसे नसल्यास, ज्याप्रमाणे एखादा दारूडा घरातील भांडी विकतो. तसेच केंद्र सरकार सरकारी कंपन्या विकण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी केला. सरकारी कंपन्या विक्रीस काढून केंद्र सरकार घरातील वस्तू विकायला निघालेल्या दारुड्यासारखे वागत असल्याची टीका वंचित बहुजन अघडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नागपूरातील पत्रकार परिषदेत केली.
हेही वाचा... 'ईटीव्ही भारत' इम्पॅक्ट; 'त्या' मुलाची मंत्री धनंजय मुंडेंनी घेतली दखल
सरकारी नवरत्न कंपन्या या सोन्याच्या कोंबड्या सारख्या आहेत. या सोन्याच्या कोंबड्या आता केंद्र सरकार विकायला निघाली आहे. ज्याप्रमाणे एखादा दारुडा दारू पिण्यासाठी घरातील वस्तू विकायला काढतो, अगदी त्याचप्रमाणे सरकार नवरत्न कंपन्या विकायला निघाली आहे. अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.
हेही वाचा.... विशेष सरकारी वकील प्रदीप घरतच लढणार अश्विनी बिद्रे खटला; सुधारीत मानधन देण्याचा गृहखात्याचा निर्णय
CAA आणि NRC च्या संबंधात ज्याप्रमाणे विद्यार्थी व गैर राजकीय संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांनी स्वतंत्र आंदोलन सुरू करायला पाहिजे. राजकीय पक्षांनी दुसऱ्याच्या मंचावर जायला नको, असेही आंबेडकर यावेळी म्हणाले. राज्यातील एकही माणूस नागरिकत्वापासून मुकणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली असल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली.