नागपूर - सक्करदरा पोलीस ठाण्याच्या शेजारी असलेल्या चौकात एका कार चालकाने वाहतूक पोलिसावर कार चढवल्याची घटना घडली आहे. आकाश चव्हाण (२७) असे कार चालकाचे नाव असून तो शहरातील त्रिमूर्ती नगर परिसरातील रहिवासी आहे. कार चालक वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला बोनेट वर सुमारे अर्धा किलोमीटर घेऊन गेला. या प्रकरणी पोलिसांनी आकाशला अटक केली आहे.
अर्धा किलोमिटर फरफटत नेले
शहरातील सक्करदरा चौकावर एका कार चालकाने गोंधळ घातला आहे. नियमांचा भंग केल्यामुळे वाहतूक हवालदाराने त्या कार चालकाला कार थांबवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर वाहतूक पोलिसाने ती कार थांबवण्यासाठी प्रयत्न केले असता कार चालकाने कारची गती वाढवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात कार चालकाने चक्क वाहतूक हवालदाराला कारच्या बोनटवर सुमारे अर्धा किलोमीटर नेले. ही संपूर्ण घटना सक्करदरा चौकात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
अन्य लोकांना ही फटका
कार चालक अत्यंत बेदरकार पणे गाडी चालवत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. त्याने पोलीस कर्मचाऱ्याला बोनेवटवर फरफटत नेले. पण त्याला खाली पाडण्याच्या नादात रस्त्यावर असलेल्या अन्य गाड्यांनाही धडक दिल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यात दोन जण जखमी झाले आहेत. त्यानंतरही तो न थांबता पुढे थेट निघून गेल्याचे दिसत आहे.
हेही वाचा- राजस्थानच्या सुरतगढमध्ये भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू
हेही वाचा- राष्ट्रीय महामार्ग सहावर धावत्या बसने घेतला पेट, प्रवाशांना सुखरुप वाचवण्यात यश