ETV Bharat / city

Burglars burglary MPs bungalow : चोरट्यांची खासदारांच्या बंगल्यात घरफोडी; काहीही न मिळाल्याने केली सामानाची नासधूस - MP Balu Dhanorkar

चंद्रपूर शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्यासारखी परिस्थिती आहे. काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या बंगल्यावर चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न ( Burglars burglary MPs bungalow ) केला. मात्र काही मौल्यवान वस्तू न सापडल्याने चोरट्यांनी घरातील सामानाची तोडफोड करून राग व्यक्त केला.

Burglars burglary MPs bungalow
चोरट्यांची खासदारांच्या बंगल्यात घरफोडी
author img

By

Published : Apr 27, 2022, 10:56 PM IST

चंद्रपूर : शहरातील चोरट्यांनी थेट खासदारांच्या बंगल्यात घरफोडी ( Burglars burglary MPs bungalow ) केली. मात्र, त्यांना तिथे काहीही मौल्यवान वस्तू न मिळाल्याने चोरट्यांनी बंगल्यातील सामानाची तोडफोड करत आपला संताप व्यक्त केला. या तिन्ही चोरट्यांना चंद्रपूर पोलिसांनी अटक केली असून, त्यांनी इतर ठिकाणी देखील घरफोडी केल्याचे समोर आले आहे.

कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचा सरकारनगर येथे सुर्यकिरण नावाचा बंगला आहे. याच बंगल्यात त्यांचे कार्यालय सुद्धा होते. आता कार्यालय दुसरीकडे हलिवले. मात्र, निवासासाठी खासदार धानोरकर याचा अजूनही वापर करतात. मंगळवारी ते मुक्कामी नव्हते. ते रात्री वरोऱ्याला निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता त्यांना या बंगल्याच्या चौकीदाराने भ्रमणध्वनीवर संपर्क साधला आणि बंगला फोडण्यात आला असल्याची माहिती दिली. रात्रीच्या सुमाराला चोरट्यांनी बंगाल्याचे मुख्यद्वाराचे कुलूप तोडून आता प्रवेश केला. त्यांना बंगल्यातील इतर खोल्यांचेही कुलूप तोडले. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे संतापलेल्या चोरट्यांनी बंगल्यातील सामानाची नासधूस केली, कपाट फोडले. झाल्या प्रकाराची तक्रार चौकीदाराने रामनगर पोलिसांत दाखल केली. त्याच रात्री सरकारनगर परिसरात आणखी दोन घरफोड्या झाल्या होत्या. खासदारांचा बंगला चोरट्यांनी फोडल्याने पोलिस यंत्रणाही हादरली. त्यांनी बंगाल्यातील सीसीटीव्ही तपासले. तेव्हा तिघे कुलूप तोडून आत प्रवेश करताना दिसले.

आरोपी अटकेत : पोलिसांनी चोवीस तासांच्या आता या तिघांना अटक केली. रोहीत इमलकर (वय २४, रा. दुर्गापूर), शंकर नेवारे (वय २०, रा. दुर्गापूर), तन्वीर बेग (वय २०, भंगाराम वॉर्ड, चंद्रपूर) अशी आरोपींची नावे आहेत. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील खून, चोरीच्या घटना वाढल्या आहे. यापार्श्वभूमीवर चक्क खासदारांचा बांगला लुटण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. त्यामुळे सरकार नगर परिसरातील नागरिकांमध्ये भिती निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांपासून चोरटे खासदारांच्या बंगाल्याची रेकी करत होते. त्यांनी खासदार येतात कधी. मुक्कामी कधी असतात, याची खडानखडा माहिती होती. त्यामुळेच खासदार नसताना त्यांनी बंगाल्यात कुलूप तोडून आत प्रवेश करण्याचे धारिष्ट केले. परंतु त्यांच्या हाती काहीच लागले नाही. आज या आरोपींना न्यायालयात सादर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या चोरट्यांनी आणखी कुठेकुठे घरफोड्या केल्या, हे पुढील चौकशीतुन समोर येणार आहे.

हेही वाचा : प्रेयसीची हौस पूर्ण करण्यासाठी घरफोडी करणारा 'तो' मजनू पुन्हा गजाआड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.