ETV Bharat / city

प्रेमात अडसर ठरत असल्यानेच खून....दुचाकीला बांधून मृतदेह विहिरीत फेकला - crime in nagpur

दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील सुकळी शिवारात बंटी चिडाम नावाच्या (24 वर्षे) तरुणाचा खून करण्यात आला होता. आरोपीने बंटीचा खून केल्यानंतर मृतदेह चक्क दुचाकीला बांधून विहिरीत फेकला. या प्रकरणाचा तपास सुरू असताना आरोपीने गुन्ह्याची कबूली दिली आहे.

nagpur police
प्रेमात अडसर ठरत असल्यानेच खून....दुचाकीला बांधून मृतदेह विहिरीत फेकला
author img

By

Published : Oct 9, 2020, 10:47 AM IST

नागपूर - बहुचर्चित बंटी चिडाम खून प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. आरोपी धीरज झलके आणि बंटीच्या चुलत बहिणीत प्रेम संबंध होते. याची माहिती मिळाल्यानंतर बंटीने आरोपीला खडसावले होते. हाच राग मनात धरून आरोपीने बंटीचा खून केल्याचे समोर आले आहे. हिंगणा पोलिसांनी आरोपी धीरज झलके याला अटक केली आहे.

प्रेमात अडसर ठरत असल्यानेच खून....दुचाकीला बांधून मृतदेह विहिरीत फेकला

दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील सुकळी शिवारात बंटी चिडाम नावाच्या (24 वर्षे) तरुणाचा खून करण्यात आला होता. आरोपीने बंटीचा खून केल्यानंतर मृतदेह चक्क दुचाकीला बांधून विहिरीत फेकला. गावातील लोकांनी बंटीचा शोध घेतल्यानंतर विहिरीजवळील एका खांबावर रक्ताचे डाग आढळून आले होते. त्याच ठिकाणी असलेल्या विहिरीकडे ओढत नेल्याच्या खुणा जमिनीवर दिसल्या होत्या. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. विहिरीच्या आत शोध घेतल्यानंतर बंटीचा मृतदेह दुचाकीला बांधलेल्या अवस्थेत आढळून आला.

यानंतर हिंगणा पोलिसांनी गावातीलच धीरज झलके या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली. मात्र आरोपी उडवाउडवीची उत्तर देत असल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय आणखीच बळावला होता. पोलिसी 'खाक्या' दाखवताच आरोपीने गुन्हा कबूल केला.

बंटी चिडाम याच्या चुलत बहिणीशी आरोपी धीरज झलके यांचे प्रेमसंबंध होते. प्रेम संबंधाबाबत धीरजला बंटीने खडसावल्याने संतापलेल्या धीरजने 7 ऑक्टोबरच्या रात्री बंटीचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून हत्या केली होती. पुरावे नष्ट करण्याचा उद्देशाने आरोपीने मृतदेह बंटीच्याच दुचाकीला बांधून शेतातील विहिरीत फेकल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.