ETV Bharat / city

Marbat Utsav 2022 काळी पिवळी मारबत, अनिष्ठ बाबींवर रोष व्यक्त करणारे बडगे; शनिवारी रंगणार मिरवणूक

author img

By

Published : Aug 26, 2022, 8:07 PM IST

Updated : Aug 26, 2022, 9:20 PM IST

काळी पिवळी मारबत Black Yellow Marbat अनिष्ठ बाबींवर रोष व्यक्त करणारे बडगे expressing anger on indecent matters Badge अशी मिरवणुक शनिवारी नागपूरात The procession will take place on Saturday रंगणार. या परंपरेला १४२ वर्षांची ऐतिहासिक historical tradition 142 year इतिहास आहे आहे. मिरवणुकीत दरवर्षी ईडा पीडा, रोगराई घेऊन जा गे मारबत अश्या घोषणा दिल्या जातात.

Marbat Utsav 2022
मारबत उत्सव 2022

नागपूर वाईट परंपरा, रोगराई, संकट समाजातून नष्ट व्हाव्यात आणि चांगल्या गोष्टींचे स्वागत करण्यासाठी मारबत उत्सव साजरा केला जातो. गेल्या 141 वर्षांपासुन ही परंपरा सुरू आहे. या मिरवणुकी दरम्यान ईडा पिडा, रोग राई, जादु टोना घेऊन जागे मारबत असे म्हणत समाजातील वाईट गोष्टींना संपविण्याचा प्रयत्न असतो. तसेच, राजकारणातील व समाजातील चुकीच्या लोकांचा, चुकीच्या मानसिकतेचा, विचारांचा विरोध देखील यावेळी केल्या जाते. या उत्‍सवात बडग्यांच्या माध्यमातुन राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक समस्यांवरही भाष्य करणारे फलक आणि सूचक ओळींनी जनतेच्या मनातला राग आणि संताप व्यक्त केला जातो. या निमित्ताने समाजातील वाईट चालीरीती आणि रोगराई दूर करण्याचे साकडे मारबतीला घालण्यात येते. आणि अखेरिस या मारबतीच्या पुतळ्यांचे दहन केल्या जाते. या दहनाबरोबरच समाजातील सगळ्या चुकीच्या गोष्टी व घातक विषाणुंचा नाश होतो. व त्यानंतर परत नव्याने सकारात्मकतेची सुरुवात होते, अशी मान्यता आहे.

कोरोनाच्या जीवघेण्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षानंतर प्रसिद्ध बडग्या मारबत उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. त्यामुळे नागपूरकरांमध्ये कमालीचा उत्साह वाढला आहे. पोळा सणाच्या आठ दिवसांपूर्वी पिवळी आणि काळी मारबतची Marbat Festival 2022 स्थापना केली जाते. दोन्ही मारबत स्थानापन्न झाल्या असून, त्यांना पूजाण्यासाठी नागरिक आता गर्दी करत आहेत. पोळ्याच्या पाडव्याला काळी आणि पिवळी मार्बत यांची भव्य अशी मिरवणूक काढली जाते. पिवळी मारबतीला देवीचे रूप म्हणून पुजले जाते, तर काळी मारबत ही दुर्जनांचे प्रतीक असल्याची मान्यता आहे.

श्रावण महीना सुरु झाला की महाराष्ट्रात सणांची रेलचेल सुरु होते. मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला ऐतिहासिक history of marbat procession वारसा. पिवळी मारबत Yellow Marbat उत्सव गेल्या १३७ वर्षांपासूनच अविरत साजरा करण्यात येतो. तर काळ्या मारबतीला Black Marbat सुद्धा १४१ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. हा असा सण साजरे करण्याची प्रथा केवळ नागपूरातच आहे. यामध्ये मारबत व बडग्या हा एकमेव असा मिरवणुक प्रकार फक्त नागपूरातच पहायला मिळतो.

भोसले घराण्यातील बांकाबाई हिने ईग्रजांशी हातमिळवणी केली त्याचा निषेध, म्हणुन बांकाबाईच्या, कागद व बांबू वापरून केलेल्या पुतळयाची, तान्ह्या पोळ्याच्या दिवशी मिरवणुक काढण्यात येते व मग त्याचे दहन होते. यामध्ये काळी व पिवळी मारबत असे दोन प्रकार आहेत. बाकांबाईच्या नवऱ्यानेपण या तिच्या कृत्याचा विरोध केला नाही, म्हणुन त्याचाही पुतळा बनवून सोबतच त्याचीपण मिरवणुक काढतात. तिच्या नवऱ्याच्या पुतळ्याला बडग्या म्हणतात. या दिवशी म्हणजेच श्रावण अमावस्येच्या दुसऱ्यादिवशी नागपूर व जवळपासच्या गाव खेडयातील लोकं नागपूरला आपल्या लहान मुलांना घेउन येतात. मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा उभे राहून मारबत व बडग्या बघतात. ही एक प्रकारे जत्राच असते. ईग्रजांचे राज्य जाऊन आज कितीतरी वर्षे लोटली. परंतु, नागपूरकर आणि या परीसरातील नागरिकांच्या मनात बांकाबाईच्या कुत्यामुळे झालेली जखम अजुन भळभळतेच आहे.

ही परंपरा मूळ आदिवासींची आहे, जी नागपुरात १८८१ सालापासून सुरू झाली. तेली समाजाच्या बांधवांनी पिवळी मारबत तयार करून तिचे दहन करण्याची प्रथा सुरू केली. तान्ह्या पोळ्याच्या दिवशी लहान मुले गल्लीबोळांतून, घेऊन जा रे मारबत घेऊन जा रे मारबत असे ओरडत फिरत असतात. काठ्या, बांबू, तरट ह्यापासून मोठे पुतळे बनवले जातात, त्यावर फाटके कपडे, चिंध्या गुंडाळतात व विविध रंगांनी रंगवतात. मारबतबरोबर जो बडग्या असतो त्याच्या गळ्यात मोडके झाडू, फाटके कपडे, फुटके डबे, टायरचे तुकडे ह्यांच्या माळा घालतात. बडग्याच्या हातात मुसळ व कमरेला उखळ बांधलेले असते.

इंग्रजांच्या काळात देशात नागरिकांना एकत्र येण्यासाठी टिळकांनी ज्या पद्धतीने पुण्यात गणेशोत्सव सुरु केला. त्याच धर्तीवर नागपूर येथे मारबत उत्सव सुरु करण्यात आला. गणेशोत्सवापेक्षा देखील जुना उत्सव मारबत आहे. प्राचीन काळात अनेक रूढी परंपरा होत्या, ज्या मानव जातीसाठी घातक ठरत होत्या. त्यांचे प्रतीक म्हणजे काळी मारबत. तर ज्या चांगल्या परंपरा आहे त्याच प्रतीक म्हणजे पिवळी मारबत. या मिरवणुकीच्या शेवटी पिवळी व काळी मारबत यांची गळा भेट केल्या जाते. आणि नंतर त्यांचे दहन केल्या जाते.

हेही वाचा Pakhe Family Bull Aurangabad बैलांच्या देखभालीसाठी महिन्याला लाखोंचा खर्च; खुराक ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Last Updated : Aug 26, 2022, 9:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.