ETV Bharat / city

अनेक दिग्गजांना मागे टाकत भाजपच्या 'या' नेत्याने पटकावली विधान परिषदेची उमेदवारी - नागपूर महानगरपालिका

भाजपमध्ये खरे तर विधानपरिषदेसाठी इच्छुक असलेल्यांच्या यादीत एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता अशा दिग्गज नत्यांची नावे होती. मात्र, भाजपकडून या सर्व नेत्यांना डावलण्यात आले आहे.

Pravin Datke
प्रवीण दटके
author img

By

Published : May 8, 2020, 6:32 PM IST

नागपूर - महाराष्ट्रातील राजकीय वातावरण हे नेहमीच गरम असते. मग ते राज्यस्तरीय राजकारण असे अथवा पक्षीय राजकारण, नेहमीच काही ना काही घडामोडी घडत असतात. सध्या राज्यात आता विधान परिषदेच्या काही जागांसाठी निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यातच भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेसाठी चार उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत भाजपचे विदर्भातील उगवते नेतृत्व आणि नागपूर महानगरपालिकेचे माजी महापौर प्रविण दटके यांच्या नावाचा आश्चर्यकारकरित्या समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा... विधानपरिषद निवडणूक : भाजपचा खडसे, पंकजा मुंडे, बावनकुळेंना धक्का, नव्या चेहऱ्यांना संधी

विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने नागपूर महानगरपालिकेचे माजी महापौर आणि वर्तमान शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपकडून विधानपरिषदेवर माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी लागणार हे पक्के मानले जात असतानाच प्रविण दटके यांच्या नावाची आश्चर्यकारक घोषणा करून, भाजपने पुन्हा एकदा बावनकुळे यांचा पत्ता कट केला आहे.

कोण आहेत प्रविण दटके?

विद्यार्थीदशेपासुनच प्रवीण दटके भारतीय जनता पक्षासोबत जोडले गेलेले आहेत. त्याचे वडील स्वर्गीय प्रभाकरराव दटके हे देखील भाजपचे कार्यकर्ते होते. तसेच ते महापालिकेचे नगरसेवकदेखील होते. त्यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुक लढवली होती, परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्यांच्या पश्चात प्रवीण दटके हे नगरसेवक म्हणून निवडून आले. भाजपकडून त्यांना ही संधी देण्यात आली होती. तेव्हापासून प्रवीण दटके सलग चारवेळा नगरसेवक म्हणून निवडणूक आले आहेत.

प्रवीण दटके यांनी आतापर्यंत भाजपच्या युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष, युवा मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष, महानगरपालिका सत्ता पक्ष नेते, महापौर आणि भाजप शहर अध्यक्ष पद भूषवले आहे. प्रवीण दटके हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. लोकसभा निवडणुकीतही नितीन गडकरी यांनी जाहीर कार्यक्रमात प्रवीण दटके यांची स्तुती केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.