नागपूर - ओबीसी भाजपाचा आत्मा आहे. या सरकारने कितीही मुस्कटदाबी केली तरी आवाज दाबू शकणार नाही. ओबीसीच्या 346 जाती राजकीय हक्कांपासून दूर झाल्या आहेत. जे मध्यप्रदेशने केले, ते काम हे झोपलेले महाविकास आघाडी सरकार करू शकले नाही. या कटकारस्थानामागे अमोल मिटकरीचे सरदार शरद पवार असल्याची टीका भाजपा नेते अनिल बोंडेंनी केली आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत ( Anil Bonde Criticized Sharad Pawar ) होते.
अनिल बोंडे म्हणाले की, भाजपा ओबीसींसाठी ( Obc Reservation ) संघर्ष करेल. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर पहिल्याच दिवशी एम्पिरिकल डेटा गोळा करा, असे सांगितले होते. तेव्हा केंद्राकडे बोट दाखवले जात होते. यांचे पाप महाराष्ट्राला भोगावे लागत असल्याचीही बोचरी टीका महाविकास आघाडीवर बोंडेंनी केली आहे.
हे सरकार सर्वाचे आवाज दाबण्याचा काम करत आहे. काँग्रेसच्या आणीबाणीची असलेली सवय आता महाविकास आघाडी सरकारला लागली आहे. ओबीसींच्या संघर्षासाठी भाजप कटीबद्ध आहे. शेतकरी असो ओबीसी असो की मराठा यांना छळण्याचे काम करत असल्याचा आरोप बोंडेंनी राज्य सरकारवर केला आहे.
हेही वाचा - Afzal Khan Tomb Security : प्रतापगड पायथ्याशी असणाऱ्या अफजल खानच्या कबरीच्या सुरक्षेत वाढ