ETV Bharat / city

जिल्हा परिषदेच्या पराभवाची लाखो कारणे... भाजप मात्र अजूनही आत्मपरिक्षणापासून दूर

author img

By

Published : Jan 9, 2020, 10:52 PM IST

नागपूर जिल्हा परिषदेत भाजपचा दारुण पराभव झाला. या पराभवाची लाखो कारणे आहेत. तरिही भाजप प्रतिनिधी या कारणांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. पराभवाच्या सत्यतेपासून भाजप नेते अजूनही दूर असल्याचे दिसत आहे.

BJP defeated in Nagpur Zilla Parishad elections
नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा पराभव

नागपूर - जिल्हा परिषदेतील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पराभवाची चर्चा केवळ नागपूर जिल्हा आणि विदर्भापर्यंत मर्यादित राहिलेली नाही. तर या पराभवाचे फटाके मुंबईसह दिल्लीत देखील फुटले. भाजपने हा पराभव स्वीकारला आहे. तरीही त्यांच्याकडे या शिवाय दुसरा पर्याय सुद्धा नाही. जिल्हा परिषद निवडणूकीत भाजपला आलेल्या अपयशाची कारणमीमांसा आमचे वरीष्ठ नेते करतील, असे भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून सांगितले जात आहे.

नागपूर जिल्हा परिषदेत भाजपचा पराभव... भाजप नेते मात्र अजूनही आत्मपरिक्षणापासून दूर

हेही वाचा.... जस्टीस लोया मृत्यू प्रकरणाची फेरचौकशी - गृहमंत्री अनिल देशमुख

राज्यातील इतर जिल्हा परिषदांपेक्षा नागपूर जिल्हा परिषदेचे निकाल हे भाजपला धक्का देणारे ठरले. जिल्ह्यात काँग्रेसने ५८ पैकी ३० जागा मिळवून एक हाती यश मिळवले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने आपला पराभव स्वीकारला असला, तरीही पराभवाच्या मुळ कारणांपासून मात्र भाजप नेते अजूनही दूर असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा... 'शेतकऱ्यांना कर्जमुक्ती बरोबरच चिंतामुक्तही करणार'

स्थानिक नेत्यांकडून पराभवाचं खापर भलतीकडेच...

निवडणुकीच्या आधी तीन दिवसांपूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या विस्तारात महाविकास आघाडीने नागपुरमध्ये ३ मंत्र्यांना वजनदार मंत्रालय दिले. ज्यामुळे काँग्रेस पक्षाच्या बाजूने मतप्रवाह तयार झाला. याचा फटका भाजपला बसल्याचे, भाजपच्या स्थानिक प्रवक्त्या अर्चना डेहनकर म्हणाल्या आहेत.

या शिवाय शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसह मोठमोठ्या घोषणा केल्यामुळेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला नागपुर जिल्ह्यात मोठे यश मिळाल्याचा निष्कर्ष भाजप नेते काढत आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणूकी आधी सत्ताधाऱ्यांकडून ग्रामीण भागातील मतदारांना धमक्या देण्यात आल्या असल्याचा गंभीर आरोपही, अर्चना डेहनकर यांनी केला.

हेही वाचा... डीआयजी निशिकांत मोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Intro:नागपूर जिल्हा परिषदेचे निकाल हे भाजपला धक्का देणारे असेच ठरले आहेत….नागपूर जिल्हात काँग्रेस ने ५८ पैकी ३० जागा मिळवून एक हाती यश मिळवलं आहे….जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत भाजपने आपला पराभव स्वीकार केला असला तरी या भाजपला प्रथमदर्शनी कोणते पराभवाकरिता दिसत आहेत याचा आढावा घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहेBody:नागपुर जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पराभवाची चर्चा केवळ नागपूर जिल्हा आणि विदर्भा पर्यंत मर्यादित राहिलेली नसून या पराभवाचे फटाके मुंबईसह दिल्लीत देखील फुटलेले आहेत...भाजपने हा पराभव स्वीकार केला असला तरी या शिवाय त्यांच्या कडे दुसरा पर्यंत सुद्धा नाही...जिल्हा परिषद निवडणूकीत भाजपला आलेल्या अपयशाच्या कारणांवर आमचे वरीष्ठ नेते यावर विचार करतील कारण शोधतील अस ही भाजप कडून सांगितलं जातं आहे..निवडणुकीच्या आधी केवळ तीन दिवसांपर्वीच राज्याच्या मंत्रिमंडळात महाविकास आघाडीतील नागपुरच्या ३ मंत्र्यांना वजनदार मंत्रालय मिळाले,ज्यामुळे काँग्रेस पक्षाच्या बाजूने मतप्रवाह तयार झाला ज्याचा फाटला भाजपला बसल्याचे अर्चना डेहनकर म्हणाल्या आहेत,या शिवाय शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी सह मोठमोठ्या घोषणा केल्यामुळेच काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसल नागपुर जिल्ह्यात मोठं यश मिळाल असल्याचा निष्कर्ष देखील भाजपने काढला आहे...जिल्हा परिषद निवडणूकीच्या आधी सत्ताधार्यांन कडून ग्रामीण भागातील मतदारांना धमक्या देण्यात आल्या होत्या, त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान केले नाही तर शेतकरी कर्जमाफीच्या यादीत यांच्या नावा समोर लाल शाहीचं निशाण लावल्या जाईल,त्यानंतर त्यांना कर्जमाफीची लाग मिळणार नाही असा खुलासा देखील डेहनकर यांनी केला आहे

Byte- अर्चना डेहनकर- प्रदेश प्रवक्त्या,भाजपConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.