नागपूर - सोमवारी विधानसभेत झालेल्या अभूतपूर्व गदारोळानंतर भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. या निलंबनाच्या विरोधात भाजप कडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. आज भाजपकडून राज्यभरात आंदोलन केले जात आहे. नागपूर मध्ये सुद्धा भाजप नेते माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी
संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीसह विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या पुतळा जाळून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
कोरोना प्रादूर्भाभावामुळे विधानसभेत ओबीसी समाजाचा इम्पेरिकल डाटा केंद्राने द्यावा, यासाठी सरकारतर्फे मांडलेला ठरावच हा घटनाविरोधी असल्याचा आरोप करत भाजप सह सत्ताधारी पक्षातील आमदारांनी विधानसभेत गोंधळ घातला. ओबीसीचे राजकीय आरक्षण नाकारण्यामागे राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप यावेळी भाजप कार्यक्रर्त्यांनी केला आहे.
ओबीसी समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न..
भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांचे निलंबन म्हणजे एकप्रकारे ओबीसीचा समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. भाजपचे आमदार निलंबित करून सरकार विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्याचा घाट घालत असले तर आम्ही गप्प बसणार नसल्याचा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे. सरकारने तात्काळ १२ आमदारांचे निलंबन मागे घ्यावे अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले आहेत.