ETV Bharat / city

बांगलादेशी विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग, पायलटला हृदयविकाराचा त्रास - nagpur airport

बिमान बांगलादेश एअरलाईन्सचे विमान हे छत्तीसगडच्या रायपूर जवळ असतांना हृदयविकाराचा त्रास पायलटला झाला. यावेळी कलकत्ता विमानतळाच्या चर्चेनंतर नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करून तात्काळ रुग्णवाहिकेच्या साह्याने पायलटला नागपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे.

nagpur airport
nagpur airport
author img

By

Published : Aug 27, 2021, 4:46 PM IST

Updated : Aug 27, 2021, 5:00 PM IST

नागपूर - बिमान बांगलादेशच्या एअरलाईन्सच्या पायलटला अचानक छातीत दुखायला लागल्याने आपत्कालीन परिस्थितीत विमान नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर उतरवण्यात आले आहे. हे विमान मस्कतवरून ढाकासाठी उडाले होते. पण भारतीय एअरस्पेस मधून जाताना वैमानिकाला हृदयविकाराचा त्रास झाल्याने 11.40 च्या सुमारास ही लँडिंग करण्यात आली. पायलटला खाजगी रुग्णलायात दाखल करण्यात आले आहे.

बिमान बांगलादेश एअरलाईन्सचे विमान हे छत्तीसगडच्या रायपूर जवळ असतांना हृदयविकाराचा त्रास पायलटला झाला. यावेळी कलकत्ता विमानतळाच्या चर्चेनंतर नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करून तात्काळ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने पायलटला नागपूरच्या खाजगी रुग्णलयात उपचार सुरू करण्यात आले आहे. नौशाद नामक या पायलटची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती नागपूर विमानतळाचे वरिष्ठ अधिकारी आबीद रुइ यांनी दिली आहे.

सर्व प्रवासी नागपूर विमानतळावरच
या विमानामध्ये जवळपास 126 प्रवासी असल्याची माहिती सांगितली जात आहे. विमान नागपूरात उतरल्यानंतर अद्यापतरी सर्व प्रवासी हे नागपूर विमानतळावर थांबले आहे. पर्यायी विमान किंवा चालक यासदर्भात अद्याप व्यवस्था झाली नाही. बिमान बांगलादेश एअरलाईन्स यावर चर्चा करून निर्णय घेतील. पण अद्यापतरी सर्व प्रवाशी नागपूर विमानतळावर असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा - OBC आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका - देवेंद्र फडणवीस

Last Updated : Aug 27, 2021, 5:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.