ETV Bharat / city

Azadi Ka Amrit Mahotsav : स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष; 'एकतेचे वस्त्र' विणण्याचा अभिनव उपक्रम - स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष मराठी बातमी

देशाच्या स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी ( Azadi Ka Amrit Mahotsav ) वर्ष आहे. त्यानिमित्त फॅब्रिक ऑफ युनिटी म्हणजेच 'एकतेचे वस्त्र' विणण्याचा अभिनव उपक्रम महा-हॅन्डलूमने हाती घेतला ( Cloth of Unity By Maha Handloom In Nagpur ) आहे.

Cloth of Unity By Maha Handloom
Cloth of Unity By Maha Handloom
author img

By

Published : Aug 1, 2022, 6:44 PM IST

नागपूर - देशाच्या स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाने देखील स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी ( Azadi Ka Amrit Mahotsav ) वर्ष वेगळ्या आणि अभिनव पद्धतीने साजरे करण्याचे ठरवले आहे. फॅब्रिक ऑफ युनिटी म्हणजेच 'एकतेचे वस्त्र' विणण्याचा अभिनव उपक्रम महा-हॅन्डलूमने हाती ( Cloth of Unity By Maha Handloom In Nagpur ) घेतला आहे. ७५ फूट लांबीचा अखंड कापड तयार केला जातो आहे. शहरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने हा उपक्रम राबवला जातो असून याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली जाणार आहे.

अधिकारी, विद्यार्थीनी, प्राध्यापिका यांची प्रतिक्रिया

एक-एक धागा विणून हातमाग यंत्रणावर वस्त्र विणण्यात सध्या शेकडो विद्यार्थी गुंतले आहेत. ते काही साधे कापड नसून ते आहे 'फॅब्रिक ऑफ युनिटी' म्हणजेच 'एकतेचे वस्त्र' आहे. आपला देश हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करीत आहे. या निमित्ताने महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या वतीने ७५ फूट वस्त्र तयार करण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे हे वस्त्र सामान्य नागरिकांच्या हातून विणण्यात येत आहे. याच उपक्रमात या शालेय विद्यार्थिनी देखील सहभागी झाले आहेत.

७५ पैकी ७४ फूट कापड तयार - १८ एप्रिल सुरु झालेला हा उपक्रम १५ ऑगस्ट पर्यंत हा महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या नागपुरातील कार्यालय राबवला जाणार आहे. सामान्य नागरिकांचं सहक्रयातून आतापर्यंत सुमारे ७४ मीटर लांब वस्त्राची निर्मिती झाली आहे. यात सामाजिक संस्था, शालेय विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, नेतेमंडळी, अधिकारी वर्ग अशा सर्वनाचा सहभाग यात लाभला आहे.

आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार नोंद - नागरिकांच्या सहकार्यातून निर्माण होणारे वस्त्र विविधतेने नटलेल्या प्राचीन भारतीय हातमाग संस्कृतीचे प्रतीक ठरणार आहे. या अभिनव उपक्रमाची नोंद ३ ऑगस्टला 'आशिया बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये होणार आहे. सोबतच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही याची नोंद होईल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या कार्यकारी संचालिका व आयुक्त शीतल तेली-उगले यांनी व्यक्त केला आहे.

७५ फूट कापडाचे जॅकेट तयार करणार - फॅब्रिक ऑफ युनिटी म्हणजेच 'एकतेचे वस्त्र' विणण्याचा अभिनव उपक्रमाअंतर्गत तयार झालेल्या ७५ फूट कापडापासून नेहरू/मोदी जॅकेट तयार केले जाणार आहेत. हे जॅकेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नागरिकांना देण्यात येणार आहे.

हेही वाचा - Eknath Shinde : पुण्यातील 'हा' तरुण दिसतो हुबेहूब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.