ETV Bharat / city

भाजप संपूर्ण देशात फोडाफोडीचे राजकारण करत आहे; अशोक चव्हाणांची टीका

भाजप संपूर्ण देशात फुटीचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. कर्नाटकमध्ये सुरू आहे ते योग्य नाही. भाजपने देशाच्या लोकशाहीला काळिमा फसण्याचा प्रयत्न केला आहे.

author img

By

Published : Jul 8, 2019, 12:21 PM IST

Updated : Jul 8, 2019, 1:01 PM IST

अशोक चव्हाण

नागपूर - काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आज नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली. परिषदेत त्यांनी कर्नाटकमधील आमदारांचा राजीनामा प्रकरण आणि वंचित बहुजन आघाडीबाबत भाष्य केले. यावेळी त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली.

अशोक चव्हाण म्हणाले, भाजप संपूर्ण देशात फोडाफोडीचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. कर्नाटकमध्ये सुरू आहे ते योग्य नाही. भाजपने देशाच्या लोकशाहीला काळिमा फासण्याचा प्रयत्न केला आहे. निवडून आलेल्या सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. त्यांची ही भूमिका योग्य नाही. भाजपकडून चाललेल्या या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी काँग्रेसने एकजुटीने राहायला पाहिजे. काँग्रेसकडून भाजपला चोख उत्तर दिले जाईल.

अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

काँग्रेसमधील राजीनामा सत्रावर बोलताना चव्हाण म्हणाले, लोकसभेनंतर राजीनामा दिला जात आहे, हे योग्यच आहे. जिम्मेदारी घेण्याचा हा प्रयत्न आहे. नवीन अध्यक्षाची नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेस जोमाने कामाला लागेल.

वंचित बहुजन आघाडीबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना चव्हाण म्हणाले, वंचितकडून परस्पर भूमिका मांडल्या जात आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. काँग्रेस वंचितसोबत आघाडीसाठी तयार आहे.

Intro:Body:

नागपूर - अशोक चव्हाण

कर्नाटक मध्ये जे सुरू आहे ते योग्य नाही भाजप संपूर्ण देशात फुटीच राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे .

भाजप देशाच्या लोकशाही ला काळिमा फसण्याचा प्रयत्न केला

निवडून आलेल्या सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे  हे योग्य नाही

काँग्रेस ने एक जुतीने राहायला पाहिजे त्यांना उत्तर दिलं जाईल

काँग्रेस मध्ये राजीनामा   सत्र -

लोकसभे नंतर राजीनामा दिला जात आहे हे योग्यच आहे जिमेदारी घेण्याचा हा प्रयत्न आहे

नवीन अध्यक्ष येईल आणि काँग्रेस जोमाने कामाला लागेल

वंचित आघाडी -

त्याच्या कडून परस्पर भूमिका येत आहे यावर प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका स्पष्ट करावी

आम्ही आमच्या कडून आघाडी साठी तयार आहो

Conclusion:
Last Updated : Jul 8, 2019, 1:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.