ETV Bharat / city

पर्यटकांसाठी खूशखबर : गोरेवाडा प्राणी उद्यानात नवीन पाहुण्यांचे आगमन; पर्यटकांची गर्दी - gorewada jungle safari

पांढरे काळवीट हे नॅशनल झू लॉजिकल पार्क दिल्ली येथून आणले आहे. त्यात नर आणि मादी असा दोन्हीचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अन्यत्र कुठेही पाहता येणार नाही असे हे पांढरे काळवीट आहेत. यात हरणाच्या प्रजातीतील जे काळवीट दिसायला पांढरे असले तरी म्युटेशन आणि जेनेटीकल झालेल्या बदलांमुळे ते रंगहीन झाले आहे. यात हे पांढरे हरीण सुद्धा इतर हरणाप्रमाणेच आहे.

पांढरे काळवीट
पांढरे काळवीट
author img

By

Published : Nov 16, 2021, 10:08 AM IST

नागपूर - बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात (Balasaheb Thackeray Gorewada International Zoological Gardens) सध्या पांढरे काळवीट (White antelope) हे आकर्षण ठरत आहे. या पांढऱ्या काळवीटला पाहण्यासाठी तसेच जंगल सफराची (jungle safari) आनंद लुटण्यासाठी गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाला पसंती देत आहे. यात प्राणी उद्यान असले तरी एकप्रकारे जंगल सफरीची आणि महाराष्ट्रात एकमेव पांढरे हरीण पाहायला लोक सध्या गर्दी करत आहे. या पांढऱ्या हरीणाबद्दल जाणून घेऊयात या विशेष वृत्तांतून...

गोरेवाडा प्राणी उद्यानात नवीन पाहुण्यांचे आगमन

नागपूरचे गोरेवाडा येथील प्राणी उद्यान हे आगळे वेगळे प्राणी उद्यान आहे. उद्यान असले तरी जंगल सफारी करण्यासाठी 564 हेक्टर जंगल उभारले आहे. यात पहिलाच टप्पाच सुरू झाला असताना पर्यटक इंडियन सफारीचा आनंद लुटत आहे. यात विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय नाव देताना साजेसे वेगळी ओळख निर्माण करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहे. यातच नव्याने आलेले पाहुने ज्यांना पांढरे काळवीट म्हणजेच हरीण हे विशेष ठरत आहे. यात महाराष्ट्रात पहिल्यांदाच हे काळवीट गोरेवाडा येथील बाळासाहेब ठाकरे अंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान मध्ये पाहायला मिळणार आहे.

राजकुमार
राजकुमार

दिल्लीतून आले हे पाहुणे -

पांढरे काळवीट हे नॅशनल झू लॉजिकल पार्क दिल्ली (National Zoo Logical Park Delhi) येथून आणले आहे. त्यात नर आणि मादी असा दोन्हीचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अन्यत्र कुठेही पाहता येणार नाही असे हे पांढरे काळवीट आहेत. यात हरणाच्या प्रजातीतील जे काळवीट दिसायला पांढरे असले तरी म्युटेशन आणि जेनेटीकल झालेल्या बदलांमुळे ते रंगहीन झाले आहे. यात हे पांढरे हरीण सुद्धा इतर हरणाप्रमाणेच आहे. यात 14 पांढरे हर, 8 हरीण, 3 सांबर आणि 18 ढेकर हे सुद्धा नव्याने आणण्यात आले आहे. पण यात नर हरीण हा काळसर रंगाचाच असतो हे विशेष आहे.

बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान

कोरोनाच्या नियमांमुळे येण्यास झाला विलंब -

यात या पांढऱ्या हरणांना सुरवातीला कोरोनाच्या नियमामुळे त्यांना वेगळे ठेवण्यात आले होते. तसे हे हरिण ऑक्टोंबर महिन्यात आले आहे. कोरोना काळात प्राण्यांची देवाण घेणाव थांबल्याने थोडा विलंब झाला आहे. यात विलगीकरणानंतर पांढऱ्या हरणाना त्यांच्या प्राणी उद्यानातील अधिवासात सोडले आहे. हेच पांढरे हरीण आता पर्यटकांना आकर्षित करत आहे. गोरेवाडात केवळ हरीण नाही तर सध्याच्या घडीला राजेशाही चाल असलेला राजकुमार नामक हा वाघ (tiger) आणि ली नावाची वाघिण यांचा जुगलबंदी पाहायला मिळत आहे. यात वाघ आणि बिबट अस्वल यांच्यासह अनेक पक्षी पाहायला मिळत आहे. सांबर, हरिण, नीलगाय हे आता पर्यटकांना साईटिंग होत असल्याने सहज पाहायला मिळत आहे.

जंगल सफारी
जंगल सफारी

पर्यटकांनी फुलले प्राणी उद्यान -

पांढरे हरीण तसेच दिवाळीच्या सुट्टीत पर्यटकांच्या गर्दीने फुलले आहे. यात बच्चे कंपनी असो की जंगल वन्यप्राणी प्रेमी येथे हजेरी लावत आहे. सुरुवातीला रोज 800 पर्यटकांचा अंदाज असल्याने त्याअनुषंगाने 3 एसी बसेस लावण्यात आलेल्या होत्या. तासा भराच्या अंतरावर सोडल्या जात होत्या. पण मागील काही दिवसात यात पर्यटकांची संख्या तब्बल दुप्पट होऊन 1400 च्या घरात पोहचली आहे. त्यामुळे गोरेवाडा प्राणी उद्यान प्रशासनाला यात बसेस वाढवून 3 बसेस भाडे तत्वावर लावाव्या लागल्या आहेत. तरीही सध्या जंगल सफारी हाऊसफुल असून अनेक पर्यटकांना येऊन परत जावे लागत आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पर्यटनाला येऊन आनंद लुटत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पण एकंदर लोकांची आणि खासकरून लहान मुलेही खूप आनंद लुटत आहे.

सफारी दरम्यान वाघाचे दर्शन
सफारी दरम्यान वाघाचे दर्शन

नवीन आकर्षणावर काम सुरूच -

लवकरच गोंड व्हिलेज छोटी ट्रेन सुरू होणार आहे. आफ्रिकन जंगल सफारीचा (African jungle safari) दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होणार आहे. यासोबतच दुर्मिळ असलेले सन गाय नावाच्या हरणाची प्रजाती आणण्यासाठी प्रयत्न चालू आहे. सध्या मणिपूर मध्येच हे सनगाय नामक हरीण पाहायला मिळते. साधारण महिन्याभरात आणखी नविन पाहुणे हे गोरेवाडा येथील बाळासाहेब ठाकरे प्राणी संग्रहालयात दाखल होणार आहे. या प्राण्यांच्या संख्येसह आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी उद्यान म्हणून हळूहळू नावारूपास शोभेल असे वन्य प्राण्याचे वैभव उदयास येत आहे हेच विशेष...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.