नागपूर - स्वातंत्र्य पूर्व इंग्रजांचा काळात स्थापन झालेल्या पशुसंवर्धन विभागाला 130 वा स्थापना ( Foundation Day of Animal Husbandry Department ) दिवसाचे औचित्य सांगून आगळी वेगळी स्पर्धा घेण्यात आली. घरातील श्वान मांजर, आणि शेळ्यांची वेशभूषा ( Animal Costume competition ) स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये आकर्षक रंगीबिरंगी कपडे, चार पायात जोडे, गळ्यात टाय घालून श्वाना लक्ष वेधणारा ठरला. या स्पर्धेत मोठ्या उत्साहात प्राणी प्रेमींनी सहभाग घेतला. कुटंबतील सदस्य म्हणून या प्राण्यांसाठी आगळा वेगळा दिवस पाळण्यात आला.
नागपूरच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने सर्वचिकित्सालय येथे स्पर्धा भरविण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्यने श्वान, मांजर पाहायला मिळाले. यावेळी जवळपास 60 प्राणी प्रेमींनी यात सहभाग घेतला. यामध्ये विशेष करून प्राण्यांपासून कोणाला चावल्यास इजा होऊ नये, यासाठी त्या प्राण्यांना मोफत रेबीजचे लसीकरण सुद्धा करण्यात आले. या स्पर्धेत बूट घालून असलेला एरॉन नावाचा छोट्याश्या श्वानाच्या पिल्याने लक्ष वेधून घेतले. यामध्ये काही भारतीय मांजर, तसेच परेशीयन ब्रीडची मांजरही या फॅशन शोमध्ये सहभागी झाले. यात फॅशन शोमध्ये रेड कार्पेटवर प्राण्यांना चालवण्यात आले.
इंग्रजांनी 130 वर्षांपूर्वी केली घोड्यासाठी स्थापना - पशुसंवर्धन विभागाची स्थापना इंग्रजांच्या काळात 20 मे 1892 रोजी मुंबई प्रांतात स्थापना झाली. त्यावेळी वाहनांची सुविधा नसल्याने मुलकी कामासाठी अश्वांची गरज पडायची. त्यांचीच देखरेख करण्यासाठी या पशुसंवर्धन विभागाची स्थापना केली. कालांतराने हळूहळू गरजेनुसार पाळीव प्राणी कुत्रा, गाय, बैल, म्हशींचा दूध आणि शेतीच्या उपयोगात येत असत. आज या विभागात अनेक मोठे बदल झाले आहे. किंबहुना क्रांती झाली अशक्य. इंग्रजांच्या काळात सुरू झालेल्या हा पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती नंतर 22 वर्षांनी 20 मे 1982 रोजी स्थापना झाला. आज 130 व्या स्थापना दिवसाला महाराष्ट्र स्थापनेचा 40 वर्ष झाली असल्याची माहिती साह्यक आयुक्त डॉ. युवराज केने यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
घरातील सदस्य असतो श्वान - पाळीव प्राण्यांची घरातील सदस्याप्रमाणे काळजी घेतली जाते. त्यामुळे पशुसंवर्धन दिवसानिमित एक वेगळा कार्यक्रम घेऊन त्या प्राण्यांबद्दल आपुलकी असणाऱ्या प्राण्यांना आज कोणी टाय आणि सुटत बुटात सजवून आणल्याची माहिती पशुसंवर्धन विभागीय प्रयोग शाळेचे साह्यक आयुक्त डॉ. संजय धोटे यांनी सांगितली.
महिन्याला होतो 2 हजाराचा - गौरव नेवारे यांच्याकडे सहा वर्षांपासून एरॉन नावाचा श्वान आहे. ते दररोज घराच्या सदस्यांना प्रमाणे सगळेच जण काळजी घेतात. त्याला रोज घरात शिजणारे अन्न खाऊ घालतात. त्यामध्ये वरण भात, बिस्किट, दूध, देतात. महिन्याला साधारण औषध आणि इतर खर्च पाहता दीड ते दोन हजार खर्च लागत असतो. रँचो नावाचाही आकाराने मोटाह दिसणारा श्वान सुद्धा काहीतरी खास होता.