ETV Bharat / city

Abdul Sattar कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर, प्रत्येक जिल्ह्यात एक दिवस शेती करणार आणि शिकणार

कृषीमंत्री एक दिवस त्या बांधावर जाऊन राहील त्या एका दिवसात आम्हाला शेतकऱ्यापासून शिकायला मिळेल त्यांच्या अडचणी काय समजेल असे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं abdul sattar tour farmer farm all maharashtra district आहे

Abdul Sattar
Abdul Sattar
author img

By

Published : Aug 19, 2022, 5:09 PM IST

नागपूर - महाराष्ट्रात पहिल्यांदाचा कृषीमंत्री आणि प्रशासनाचे प्रमुख अधिकारी हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत. याबाबतची एक योजना अंमलात आणणार असल्याचे नवनियुक्त कृषीमंत्री अब्दुल सत्तार Agriculture minister abdul sattar यांनी जाहीर केलं आहे. ते नागपुरात विभागीय कार्यालयात विदर्भातील जिल्ह्यात झालेल्या नुकसान भरपाईच्या दौऱ्या संदर्भात आढावा बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी खासदार कृपाल तुमाने, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित abdul sattar tour farmer farm all maharashtra district होते.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

'कृषीमंत्री एक दिवस शेतकऱ्याच्या बांधावर जाणार' - कृषीमंत्री अब्दुल सत्तार बोलताना म्हणाले की, कृषी विभागाचे आणि महसूल विभागाचे आयुक्त, जिल्हाधिकारी हे एक दिवस एका गावात जाऊन शेतकऱ्यांचा दिनचर्या समजून घेतील. शेतकरी उन्हा तान्हात जाऊन किती घाम गाळतो किती रक्त जाळतो हे जाणून घेणार आहे. तो निंदन करेल तर आम्ही पण ते निंदन शिकू हे सर्व आम्ही एक दिवस सोबत राहून शिकू महाराष्ट्रात पहिल्यांदा असं घडेल. कृषीमंत्री एक दिवस त्या बांधावर जाऊन राहील. त्या एका दिवसात आम्हाला शेतकऱ्यापासून शिकायला मिळेल, त्यांच्या अडचणी काय समजेल, त्यावर उपाययोजना काय करायचे हे समजेल. याची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रात होणार असून, मी स्वतः मंत्री म्हणून सर्व जिल्हे फिरणार आहे, अशी योजना लवकरच आणणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे.

'मी लोकल गाडी आहे, हात दाखवा कुठे थांबवा' - देशातले कृषीमंत्री राहिलेल्या शरद पवार यांचे मार्गदर्शन घ्यायला मला काही हरकत नाही. शरद पवार यांच्या सारख्या नेत्याचं महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्यासाठी मार्गदर्शन मिळालं तर चांगलचं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी सुद्धा शेतकऱ्यांसोबत काम केले, तेही तज्ञ आहेत. त्यांच्याकडेही मी आणि कृषी विभागाचा सचिव जाऊन मार्गदर्शन घेणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा फायदा ज्याच्या ज्याच्यात असेल ते करण्यात मला काही इगो नाही. मी लोकल गाडी आहे, हात दाखवा कुठे थांबवा शेतकऱ्याचा फायदा ज्याच्यात होईल ते करण्यात मी कुठेही कमी पडणार नाही. आमच्या नेते मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री यांच्या आदेश आहे की शेतकऱ्यांशी भेटा चर्चा करा आणि त्यांच्या वेदना समजून घ्या, त्याची सुरुवात मी जालण्यात आढावा घेऊन केली. आता तीन दिवस विदर्भ, मराठवाडा विभागात जाणार आहे. यासंदर्भात मी विधानसभेत मला उत्तर द्यायचा आहे. सोमवारी या संदर्भात अधिवेशनात बोलेल, असे सुद्धा अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.

'शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत' - जुलै महिन्यात नुकसान झालेल्या नुकसाणीचे पंचनामे झाले आहेत. पण, ऑगस्ट महिन्यात पडलेल्या पाऊसाच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले नाहीत. लवकरच पंचनामे करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. यात नुकसान झालेला एकही शेतकरी वंचित राहणार नाही की ज्याला नुकसानभरपाई मिळणार नाही. याची काळजी घेणार आहे. कृषी विद्यापीठाची मदत घेऊन वारंवार होत असलेले कीड, रोग यांच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यावर संशोधन करून टाळण्यासाठी काम केले जाईल, असेही कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

हेही वाचा - Ramdas Athawale शिर्डीतून लोकसभेला लढण्यास इच्छुक, रामदास आठवलेंनी व्यक्त केली इच्छा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.