ETV Bharat / city

गोपीचंद पडळकर विरोधात नागपुरातही विरोध प्रदर्शन; तोंड काळे करण्याचा इशारा

नागपुरात गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या बेताल वक्तव्यामागे त्यांच्याच पक्षातील नेते असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. गोपीचंद पडळकर यांची पवार साहेबांबाबत बोलण्याची त्यांची लायकी नाही, असे म्हणत पडळकर नागपुरात आल्यास त्यांचे तोंड काळे करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

agitation-in-nagpur-against-bjp-mla-gopichand-padalkar
गोपीचंद पडळकर विरोधात नागपुरातही विरोध प्रदर्शन
author img

By

Published : Jun 25, 2020, 5:49 PM IST

नागपूर - भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केले होते. याप्रकरणी आज नागपुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. यावेळी आंदोलकांनी पडळकरांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या फोटोला कार्यकर्त्यांनी जोडे मारले.

राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर बाळबुधे आणि शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले. गोपीचंद पडळकर यांच्या बेताल वक्तव्यामागे त्यांच्याच पक्षातील नेते असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. गोपीचंद पडळकर यांची पवार साहेबांबाबत बोलण्याची त्यांची लायकी नाही, असे म्हणत पडळकर नागपुरात आल्यास त्यांचे तोंड काळे करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान, या आंदोलनात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गोपीचंद पडळकर विरोधात नागपुरातही विरोध प्रदर्शन

काय आहे प्रकरण...

पंढरपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्यावर वादग्रस्त विधान केले. गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे की, "शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे, असे माझे मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचे नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढेही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचे आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे." असे विधान पडळकर यांना केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.