नागपूर - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे रियाज भाटीशी संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या टीकेलाही अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पावडरच्या पैशांतून कुणाचे अल्बम तयार झाले? वरळीत 200 कोटींचे फ्लॅट कुणी घेतले? असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला होता. त्यांनी केलेल्या आरोपावर फडणवीसांनी बोलणे टाळले. मात्र मी याबाबत ट्वीट केले आहे ते बोलके आहे असे ते म्हणाले. तसेच आशिष शेलार यांनी उत्तर दिले आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते नागपुरात विमानतळावर बोलत होते.
-
Dev_Fadnavis: एसटी कर्मचार्यांच्या मागण्यासंदर्भात राज्य सरकार असंवेदनशील आहे आणि सध्या होत असलेल्या आंदोलनाची राज्य सरकारने त्वरित दखल घ्यावी!
— Devendra Fadnavis Fan (@Dev_Fadanvis) November 10, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
नागपूर येथे माध्यमांशी साधलेला संवाद..https://t.co/pra9LtGp89 pic.twitter.com/PwiE0IKyGO
">Dev_Fadnavis: एसटी कर्मचार्यांच्या मागण्यासंदर्भात राज्य सरकार असंवेदनशील आहे आणि सध्या होत असलेल्या आंदोलनाची राज्य सरकारने त्वरित दखल घ्यावी!
— Devendra Fadnavis Fan (@Dev_Fadanvis) November 10, 2021
नागपूर येथे माध्यमांशी साधलेला संवाद..https://t.co/pra9LtGp89 pic.twitter.com/PwiE0IKyGODev_Fadnavis: एसटी कर्मचार्यांच्या मागण्यासंदर्भात राज्य सरकार असंवेदनशील आहे आणि सध्या होत असलेल्या आंदोलनाची राज्य सरकारने त्वरित दखल घ्यावी!
— Devendra Fadnavis Fan (@Dev_Fadanvis) November 10, 2021
नागपूर येथे माध्यमांशी साधलेला संवाद..https://t.co/pra9LtGp89 pic.twitter.com/PwiE0IKyGO
लवकरच विधान परिषदेच्या उमेदवाराची यादी -
विधान परिषद निवडणूक जाहीर झालेली आहे. लवकरच यासंदर्भात भाजपाच्या स्टेट इलेक्शन कमिटीची बैठक होईल. त्या बैठकीत भाजपाचे विधान परिषदेच्या उमेदवार संदर्भात चर्चा केली जाईल. त्यानंतर ती शिफारस भाजपाच्या केंद्राच्या पार्लमेंट्री बोर्डकडे पाठवू. त्यात ठरल्यानंतर नावाची यादी तयार होईल. त्यासाठी थोडी वाट पाहा असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
'आम्ही सरकारला मदत करायला तयार'
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे यासाठी संप सुरू आहे. त्यात राज्य सरकारची भूमिका ही असंवेदनशील आहे. वाद चिघळू नये असे वाटत आहे पण सरकार दमनशाही पद्धतीने दबाव टाकून कर्मचाऱ्यांवर कारवाई करून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. यासंदर्भात सरकारने कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यातून मार्ग काढायला पाहिजे. जेणेकरून कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल. पण इतक्या मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या होऊन सरकारला जाग येत नसेल तर हे चुकीचे आहे. त्यासंदर्भात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर असो की अन्य सदाभाऊ खोत असो सगळे लोक हे आंदोलन करत आहेत. या सरकारने याची दखल घेऊन मार्ग काढायला पाहिजे. विरोधीपक्ष म्हणून आम्ही सरकारला मदत करायला तयार आहेत असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
हेही वाचा - वरळीत 200 कोटींचा फ्लॅट कुणाचा आहे? अमृता फडणवीसांच्या टीकेला मलिकांचे उत्तर