ETV Bharat / city

Scrub Typhus in Vidarbha - कोरोना, स्वाईन फ्ल्यूनंतर विदर्भात स्क्रब टायफस रोगाची एन्ट्री - पाच रुग्णांच्या मृत्यूने वाढवली चिंता

कोरोना, स्वाईन फ्ल्यूनंतर विदर्भात स्क्रब टायफसच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचं दिसून येतं आहे (Scrub Typhus in Vidarbha). स्क्रब टायफसमुळे विविध खासगी रुग्णांलयांमध्ये रुग्णांची संख्या वाढली. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा जिल्ह्यात स्क्रब टायफसचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यतः पावसाळ्यात स्क्रब टायफसचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी योग्य खबरदारी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.

Scrub Typhus in Vidarbha
Scrub Typhus in Vidarbha
author img

By

Published : Sep 12, 2022, 6:06 PM IST

नागपूर : पावसाचा लपंडाव सुरू असल्याने नागपुरात साथीचे आजार वाढू लागले आहेत. कोरोना, स्वाईन फ्ल्यूनंतर विदर्भात स्क्रब टायफसच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचं दिसून येतं आहे. गेल्या काही दिवसात स्क्रब टायफसमुळे विविध खासगी रुग्णांलयांमध्ये रुग्णांची संख्या वाढली असून पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने या आजाराची गंभीरता वाढली आहे.मात्र, या संदर्भात आरोग्य विभागाकडे अद्याप तरी या संदर्भात फारसी माहिती उपलब्ध नाही,त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नागपूर विभागात नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा जिल्ह्यात स्क्रब टायफसचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यतः पावसाळ्यात स्क्रब टायफसचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी योग्य खबरदारी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.

पाच रुग्णांच्या मृत्यूने वाढवली चिंता : उपराजधानी नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असली आहे. मात्र,गेल्या महिन्यात स्वाईन फ्ल्यूचा आजाराने डोकं वर काढल्याने चिंता वाढली असताना आता स्क्रब टायफसचा आजार हळूहळू वाढताना दिसून येतो आहे. १ सप्टेंबर रोजी नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय मध्ये स्क्रब टायफसमुळे एकाचा मृत्यू झाला होता. तर ग्रामीण भागातील एका रुग्णाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मेडिकल रुग्णालयात आणखी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या १०० पेक्षा अधिक रुग्ण ऍक्टिव्ह आहेत.

स्क्रब टायफसचे लक्षण जाणून घ्या : झाडीझुडूप किंवा गवतावर स्क्रब टायफसचे हे किडे आढळतात. गवत कापताना गवतावर बसल्याने माणसाला ये चावतात. गवतावरील कीटक चावल्यावर यातील "ओरिएंशिया सुसूगामुशी" नावाचा जिवाणू आपल्या शरीरात गेल्यावर हा आजार होतो. या आजारामुळे मृत्यूचं प्रमाण 30 टक्के असल्याने हा आजार अतिशय घातक असल्याचं म्हटलं जातं. हा जिवाणू शरीरात गेल्यावर जवळपास १५ ते २० दिवसांनी लक्षण दिसतात. सुरुवातीला ताप, डोकेदुखी, हातपाय दुखणं, मळमळ, ओकाऱ्या आणि इतर तापाच्या रोगासारखी लक्षण असतात. त्यामुळे बऱ्याच रुग्णांमध्ये मलेरिया, विषमज्वर किंवा डेंग्यू असण्याची शक्यता वर्तवली जाते. ज्या ठिकाणी चिगर चावतो त्या ठिकाणी एक व्रण असतो, ज्याला इशर म्हणतात. हा दिसला तर रोगनिदान नक्की झालं असं समजण्यात येतं. परंतु ४० टक्के रुग्णांमध्ये हा इशर दिसत नाही. लवकर निदान झाल्यास स्क्रब टायफस आटोक्यात येऊ शकतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.