ETV Bharat / city

नागपूर जिल्ह्यात प्रशासन आपल्या गावी उपक्रम होणार सुरू, ग्रामीण भागाला न्याय देण्यासाठी प्रशासनाचा उपक्रम - नागरिकांना न्याय देण्याची भूमिका

नागपूर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी 'प्रशासन आपल्या गावी' या मंडळ स्तरीय उपक्रमाची सुरुवात केली जाणार आहे. नागरिकांची प्रलंबित कामे तातडीने सुटावीत, त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, शासनाच्या विविध कार्यालयाचा एकमेकांशी व नागरिकांशी परस्पर समन्वय रहावा, यासाठी ही उपाययोजना करण्यात येणार आहे.

नागपूर जिल्ह्यात प्रशासन आपल्या गावी उपक्रम होणार सुरू

author img

By

Published : Sep 17, 2022, 3:35 PM IST

नागपूर - जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या विविध विभागाच्या प्रलंबित प्रश्नांना एका छताखाली जलद गतीने न्याय देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी 'प्रशासन आपल्या गावी' या मंडळ स्तरीय उपक्रमाची सुरुवात केली जाणार आहे. नागरिकांची प्रलंबित कामे तातडीने सुटावीत, त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, शासनाच्या विविध कार्यालयाचा एकमेकांशी व नागरिकांशी परस्पर समन्वय रहावा, यासाठी ही उपाययोजना करण्यात येणार आहे.

नागरिकांना न्याय देण्याची भूमिका - तालुकास्तरीय विविध यंत्रणा अधिकारी आणि कर्मचारी यांनी एकत्र येऊन सर्व नागरिकांच्या समस्यांना न्याय देण्याची भूमिका आहे. या योजनेचे नियंत्रण संबंधित विभागाचे उपविभागीय अधिकारी करणार आहेत. एकाचवेळी सर्व तालुक्यांमध्ये दर शुक्रवारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

प्रत्येक शुक्रवारी होणार आयोजन - प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांनी शुक्रवारी एका मंडळात हे आयोजन करायचे आहे. या कार्यक्रमाची पूर्वतयारी नियोजन करण्यासाठी सर्व तालुकास्तरीयंत्रणांची बैठक घेऊन कार्यक्रमाची आखणी तहसीलदार करणार आहे.

एकाच ठिकाणी सर्व विभाग - यावेळी सर्व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित राहतील. यामध्ये तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका उपअधीक्षक, भूमि अभिलेख, वनपरिक्षेत्र अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, पंचायत गटशिक्षण अधिकारी, नायब तहसिलदार महसूल, नायब तहसीलदार पुरवठा, उपअभियंता महावितरण, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, मंडळातील अधिकारी, शाखा अधिकारी, कर्मचारी तसेच मंडळातील सर्व तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक इत्यादी ग्राम पातळीवर कर्मचारी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

अंमलबजावणी सनियंत्रण समिती गठीत - या उपक्रमाची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीही गठीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, उपवनसंरक्षक अशा जिल्हास्तरीय 20 विभाग प्रमुखांची या समितीमध्ये वर्णी लावण्यात आली आहे. प्रत्येकाला जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. प्रत्येक विभागाने कोणते काम करावे या संदर्भातील निर्देश आज देण्यात आले. प्रत्येक ठिकाणाच्या उपक्रमानंतर अनुपालन अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

उपक्रमाची वैशिष्ठ्ये - दर शुक्रवारी सर्व मंडळात एकाचवेळी कार्यक्रम, तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली सर्व विभागाचा समन्वय, जिल्हा परिषद शाळा किंवा सार्वजनिक ठिकाणी आयोजित करणार, कार्यक्रमांना लोकप्रतिनिधींना आमंत्रित करणार. उपविभागीय अधिकारी सनियंत्रण ठेवणार, जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती पुढे अनुपालन अहवाल सादर होणार. ही या कार्यक्रमाची वैशिष्ठ्ये आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.