ETV Bharat / city

ज्येष्ठ अभिनेते विरा साथीदार यांचे कोरोनामुळे निधन - नागपूर लेटेस्ट न्यूज

ज्येष्ठ अभिनेते विरा साथीदार यांचे आज कोरोनामुळे निधन झाले आहे. आठ दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर गेल्या पाच दिवसांपासून एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची आज सकाळी प्राणज्योत मालवली.

विरा साथीदार
विरा साथीदार
author img

By

Published : Apr 13, 2021, 3:08 PM IST

Updated : Apr 13, 2021, 3:28 PM IST

नागपूर - ज्येष्ठ अभिनेते विरा साथीदार यांचे आज कोरोनामुळे निधन झाले आहे. आठ दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर गेल्या पाच दिवसांपासून एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची आज सकाळी प्राणज्योत मालवली. विरा साथीदार यांना उत्तम अभिनेत्यासह, चळवळीतील कार्यकर्ता, आंबेडकरवादाचे अभ्यासक म्हणून देखील ओळखलं जातं. कोर्ट चित्रपटातून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या अभिनयाची दखल घेण्यात आली होती. पथनाट्य आणि नाट्य चळवळीतून त्यांनी सातत्याने प्रहार केले.

विरा साथीदार यांचा परिचय

विरा साथीदार यांचा जन्म वर्धा जिल्ह्यात झाला. मात्र त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य नागपूरच्या जोगीनगर झोपडपट्टीत घालवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वीरा साथीदार यांच्यावर पगडा होता. ते स्वत: गीतकार, पत्रकार होते. आंबेडकर चळवळीतील अनेक गाणीही त्यांनी गायली आहेत. विविध ठिकाणी ते मार्गदर्शनपर व्याख्याने द्यायचे. पुढे पत्रकार म्हणून काम करताना त्यांनी शोषित-पीडितांना न्याय देण्यासाठी मोठा संघर्ष केला. ‘विद्रोही’ नावाच्या मासिकाचे संपादन केले. ‘रिपब्लिकन पँथर’ संघटनेच्या माध्यमातून ते वंचितांसाठी काम करत होते. चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटात विरा साथीदार यांच्या अभिनयाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने सामाजिक आणि सांस्कृतीक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा - सातारची साखरगाठी परदेशात गेलीच नाही; कमी उत्पादनामुळे शहरातही चणचण

Last Updated : Apr 13, 2021, 3:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.