ETV Bharat / city

सोनू सूदवरील आयक विभागाची कारवाई जाणीवपूर्वक, आप'चे नागपूरमध्ये धरणे आंदोलन

अभिनेता सोनू सूद यांच्यावर आयकर विभागाने जाणीवपूर्वक कारवाई केल्याचा आरोप करत, आम आदमी पार्टीकडून आंदोलन करण्यात आले. शहरातील व्हेरायटी चौकात भाजपच्या विरोधात नारेबाजी करत या कारवाईचा आंदोलकांनी निषेध केला.

अभिनेता सोनू सूद यांच्यावर आयकर विभागाने जाणीवपूर्वक कारवाई केल्याचा आरोप करत, आम आदमी पार्टीकडून आंदोलन

author img

By

Published : Sep 22, 2021, 7:04 AM IST

नागपूर - प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद यांच्यावर आयकर विभागाने जाणीवपूर्वक कारवाई केल्याचा आरोप करत, आम आदमी पार्टीकडून आंदोलन करण्यात आले. शहरातील व्हेरायटी चौकात भाजपच्या विरोधात नारेबाजी करत कारवाईचा निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. 'वि सपोर्ट सोनू सूद' असे फलक हातात घेऊन आंदोलकांनी प्रदर्शन केले.

आप'चे नागपूरमध्ये आंदोलन

भाजपकडून आयकर विभागाची धाड टाकून कारवाई केल्या जात आहेत

कोरोना काळात अनेक गरजूंना मदतीचा हात देणारे प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद यांच्यावर इनकम टॅक्स विभागाने नुकतीच छापेमरिची कारवाई केली. ही कारवाई दिल्लीच्या आप सरकारचे शिक्षणाचे मॉडेल भारतभर पोहचवण्याचे काम अभिनेता सोनू सूद यांनी हाती घेतलेले आहे. त्यानंतर भाजपकडून आयकर विभागाची धाड टाकून कारवाई केल्या जात असल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला आहे. ही करवाई त्रास देण्यासाठी केली जात असून या विरोधात नागपूरमधील आम आदमी पार्टीच्या युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सोनू सूद यांच्या समर्थनात एकत्र आले. सीताबर्डी परिसरात माहात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ हातात फलक घेऊन 'वि सपोर्ट सोनू सूद' असे नारे दिले. भाजप सरकार आयकर विभागाला समोर करत होत असलेल्या करवाईच्या विरोधात घोषणा देण्यात आल्यात.

आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

यावेळी आंदोलनात राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग नागपूर संयोजिका कविता सिंगल, विदर्भ सोशल मीडिया प्रमुख गीता कोईकर यांच्या मार्गदर्शनाखाली, विदर्भ युवा आघाडीचे संयोजक पीयुष आकरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. प्रामुख्याने राज्य युवा समिति सदस्य कृतल आकरे, युवा पूर्व विधर्भ संघटन मंत्री सौरभ दुभे, नागपुर युवा अध्यक्ष गिरीश तितरमारे, सचिव प्रतिक बावनकर, उत्तर नागपूर संयोजक रोशन डोंगरे, स्वप्निल सोमकुवर, हेमंत पांडे, पंकज मेश्राम, प्रियंका तांबे उपस्तित होते.

हेही वाचा - आज पुन्हा अभिनेता सोनू सूदचे घर आणि कार्यालयात आयकर विभागाचे सर्वेक्षण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.