ETV Bharat / city

नागपुरात बंदूक घेऊन वैद्य कुटुंबाच्या घरात शिरला गुंड, ५० लाखांची मागितली खंडणी - hundkeshwar police station nagpur

हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिवळा फाटा परिसरात राहणारे राजू वैद्य यांच्या घरी बंदूक घेऊन एक गुंड शिरला होता. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

Vaidya familys house
वैद्य कुटुंबाचे घर
author img

By

Published : Jun 4, 2021, 6:17 PM IST

Updated : Jun 4, 2021, 8:06 PM IST

नागपूर - शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिवळा फाटा परिसरात राहणारे राजू वैद्य यांच्या घरी बंदूक घेऊन एक गुंड शिरला होता. त्या गुंडाने बंदुकीच्या धाकावर वैद्य कुटुंबीयांना तब्बल तीन तास ओलीस ठेवले होते. आरोपीने वैद्य कुटुंबीयांकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पोलिसांना याची माहिती मिळताच नियोजनबद्ध पद्धतीने आरोपीला पकडण्यात आले असून, त्याला अटक केली आहे.

नागपुरात बंदूक घेऊन वैद्य कुटुंबाच्या घरात शिरला गुंड

हेही वाचा - जालन्यातील 'त्या' मांत्रिकाला अटक; पैशाचा पाऊस पाडण्यासाठी कुटुंबातील सदस्याचा बळी मागितला होता

  • वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी -

दरम्यान, या संदर्भात पोलीस विभागाला माहिती समजताच हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. या शिवाय गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्यासह अनेक मोठे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते. सुमारे तीन तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

  • वैद्य कुटुंबीयांना तीन तास ठेवले होते ओलीस -

पोलिसांनी आरोपीच्या नावाचा खुलासा केलेला नाही. शिवाय वैद्य यांच्या घरातच शिरण्यामागील कारण पोलीस शोधत आहेत. आरोपीने वैद्य कुटुंबातील तीन सदस्यांना बंदुकीच्या धाकावर ओलीस ठेवल्याने परिस्थिती अतिशय गंभीर झाली होती. पोलिसांनी आरोपीला आत्मसमर्पन करण्याची विनंती केली. मात्र, आरोपी ऐकायला तयार नव्हता. पोलिसांनी आरोपीला गुंतवूण ठेवण्यासाठी दर तासाला दोन लाखांची रक्कम दिली होती. त्यानंतर पोलिसांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत वैद्य कुटुंबीयांच्या घरात प्रवेश करत आरोपीच्या अंगावर जाळी फेकून त्याला अटक केली आहे. या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने परिसरात पोलिसांची मोठी फौज तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्या जवळील एक बंदूक आणि एक चाकू जप्त केला आहे.

हेही वाचा - अभिनेत्री जुही चावलाची 5जी विरोधातील याचिका फेटाळली; ठोठावला 20 लाखांचा दंड

Last Updated : Jun 4, 2021, 8:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.