नागपूर- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे ६६ वे राष्ट्रीय अधिवेशन यंदा नागपुरात होणार आहे. तब्बल २५ वर्षानंतर हे अधिवेशन नागपुरात होणार आहे. येत्या २५ ते २७ डिसेंबरदरम्यान हे अधिवेशन होणार आहे. नागपुरातील रेशीमबागेतील स्मृतीभवनात हे अधिवेशन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अधिवेशनाची तयारी अभाविपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे अधिवेशन ऑनलाईन होणार असल्याची माहिती आहे. शिवाय या अधिवेशनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला संघातील ज्येष्ठ व्यक्तींची उपस्थित असणार आहे.
ऑनलाईन पद्धतीने होणार अधिवेशन-
कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता यंदा अभाविपकडून आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या तयारीला सुरूवात करण्यात आली आहे. हे अधिवेशन ऑनलाईन पद्धतीने काही मोजक्याच्या सदस्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. शिवाय इतर सदस्यांना ऑनलाईन पद्धतीने या अधिवेशनात सहभागी होता येणार आहे. याकरीता अभाविपकडून व्यवस्था देखील करण्यात आल्याची माहिती आहे.
देशभरातील पदाधिकाऱ्यांचे गौरव व निवड-
या अधिवेशनात देशभरातील जवळजवळ २ ते ३ लाख पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती आहे. शिवाय इतर पदाधिकाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने सहभाग सहभाग घेता येणार आहे. या अधिवेशनात विविध सत्र होणार आहेत. त्यात पदाधिकाऱ्यांना वरिष्ठांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच याच अधिवेशना दरम्यान नविन राष्ट्रीय कार्यकारणीची निवड देखील करण्यात येणार आहे. तसेच प्रदेशमंत्री, संघटनमंत्री यांचीदेखील निवड या अधिवेशनात करण्यात येणार आहे. शिवाय काही पुरस्काराने विविध पदाधिकाऱ्यांना गौरवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
या प्रस्तावांवर होणार चर्चा-
या अधिवेशनात काही प्रस्तावांवर चर्चा देखील करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यात कोरोना काळातील अभाविप सदस्यांनी केलेली विविध कामे, राष्ट्रीय प्रश्न, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, भविष्यातील शैक्षणिक स्थिती यावर चर्चा करण्यात येणार आहे. तब्बल २५ वर्षानंतर हे अधिवेशन नागपुरात होणार असल्याने सध्या या अधिवेशनाकरीता अभाविपकडून जोरदार तयारी करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - भारत बंद : उपराजधानी नागपुरात 'बंद'चा प्रभाव नाही
हेही वाचा - 'वीज तोडायला येणाऱ्यांचे पाय तोडू'! विदर्भवादी नेते राम नेवले यांचा इशारा