नागपूर: नवरात्र-गरबा उत्सवात आधार कार्ड तपासूनच प्रत्येकाला मंडपात प्रवेश द्या, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली. लव-जिहाद सारख्या अप्रिय घटना टाळायच्या असतील तर आत्ताच काळजी घेतलेली बरी असा तर्क विश्व हिंदू परिषदेकडून देण्यात आला आहे. गरबा उत्सवात श्रद्धा नसतानाही अनेक इतर धर्मीय प्रवेश करतात आणि हिंदू महिला आणि तरुणींची छेड काढतात.
पुढे लव्ह जिहाद सारख्या समस्या निर्माण होतात. गरबा उत्सव (garba festival) हा श्रद्धेचा आणि उपासनेचा विषय आहे. तो सार्वजनिक इव्हेंट नाही, त्यामुळे गरबा आयोजनाच्या स्थळी फक्त हिंदू धर्मियांना प्रवेश दिला जावा. त्यासाठी प्रत्येकाचे आधारकार्ड तपासले जावे. अशी सूचना विश्व हिंदू परिषदेने करण्यात गरबा उत्सव आयोजन करणाऱ्या मंडळांना केली आहे.
गरज भासल्यास विंहिप कार्यकर्ते उभे राहतील यासंदर्भात विश्व हिंदू परिषदेने विदर्भात अनेक ठिकाणी गरबा आयोजन करणाऱ्या मंडळांची भेट घेतली आहे. तर पोलीस अधिकाऱ्यांशी भेटणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत प्रमुख गोविंद शेंडे यांनी दिली आहे. गरज भासल्यास विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते गरबा उत्सव आयोजनस्थळी उभे राहून मंडळांना मदत करतील. आयोजन मंडळ आणि पोलिसांनी यात पुढाकार घ्यावा असे शेंडे म्हणाले होते.