नागपूर - प्रेम विवाह ( Love Marriage ) केल्यानंतर उभा केलेला संसार टिकवण्यासाठी चोऱ्या करणाऱ्या एकास नागपूर शहरातील सोनेगाव पोलिासांनी अटक केली. त्यास वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता त्याने पोलिसांच्या हातात तुरी देऊन पळ ( Thief Escaped from Police Custody ) काढला. पंकज उरकुडे, असे त्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पंकज उरकुडे याने गेल्याच महिन्यात प्रेम विवाह केला. तो पत्नीसह अमरावती जिल्ह्यात राहू लागला. दरम्यान, त्याला पैशाची चणचण भासू लागली. त्यानंतर त्याने मित्र प्रणय ठाकरेला संपर्क केला. चोऱ्या करण्यासाठी मदत केल्या पैसे मिळतील, असे प्रणयने पंकजला सांगितले. नव्या संसाराचा गाडा सुरळीत चालावा म्हणून पंकजनेही होकार दिला. त्यानंतर दोघांनी सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनीष लेआऊटमध्ये राहणाऱ्या शर्मा नावाच्या व्यक्तीच्या घरातून एक लाख रुपये रोख रक्कम व मोबाईल चोरले. अशीच घटना बजाज नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांचा ( Nagpur Police ) संशय प्रणय व पंकजवर आहे.
मोबाईल सुरू केला अन् पोलिसांच्या हाती लागला - प्रणय ठाकरे व पंकज उरकुडे यांनी शर्मा या व्यक्तीच्या घरुन चोरलेल्या मुद्देमालातील मोबाईल पंकजने स्वतःकडे ठेवला. काही दिवसांनंतर त्याने तो मोबाईल सुरू केला. यामुळे नागपूर पोलिसांच्या सायबर सेलला ( Nagpur Police Cyber Cell ) त्याचे लोकेशन कळाले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करत पंकजच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून पोलिसांनी एक चारचाकी वाहन, 1 लाख 75 हजार रोख रक्कम, टीव्ही आणि मोबाईल जप्त केला आहे. त्यानंतर प्रणयच्या अटकेसाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केला.
अन पंकज गेला पळून - पंकजला अटक केल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पोलिसांच्या एका पथकाने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे घेऊन गेले होते. त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांना धक्का देऊन तो पोलिसांच्या तावडीतून निसटला ( Thief Escaped from Police Custody ). आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून गेल्याची पुष्टी पोलीस उपायुक्त लोहित मतानी ( DCP Lohit Matani ) यांनी केली आहे.
हेही वाचा - Stealing Tap from Railway Bogie : रेल्वेच्या स्वच्छतागृहातील नळाच्या तोट्या चोरणारा अटकेत