ETV Bharat / city

दुषित रक्ताने घेतला एका चिमुकल्याचा जीव, एचआयव्ही बाधित मुलाच्या पित्याने सरकारकडे केली 'ही' मागणी...

नागपूर शहरात एक धक्कादायक बाब उघडकीस ( Children HIV Positive In Nagpur ) आली आहे. येथील थॅलेसेमियाच्या रुग्ण असलेल्या चार लहान मुलांना दूषित रक्त मिळाल्याने एचआयव्हीचे संक्रमण झाले आहे. तर, यातील एका मुलाचा एचआयव्हीने मृत्यू झाला ( Children HIV Positive After Blood Transfusion ) आहे.

Children HIV Positive After Blood Transfusion

author img

By

Published : May 26, 2022, 8:16 PM IST

Updated : May 26, 2022, 9:28 PM IST

नागपूर - नागपूर शहरात एक धक्कादायक बाब उघडकीस आली ( Children HIV Positive In Nagpur ) आहे. येथील थॅलेसेमियाच्या रुग्ण असलेल्या चार लहान मुलांना दूषित रक्त मिळाल्याने एचआयव्हीचे संक्रमण झाले आहे. तर, यातील एका मुलाचा एचआयव्हीने मृत्यू झाला आहे. यामुळे एकच थरकाप उडाला आहे. यातील एका चिमुकल्याच्या पित्याने ईटिव्ही भारतशी बोलताना आपले दु:ख व्यक्त केले आहे. जर, माझ्या मुलाला नॅट टेस्ट रक्त न मिळाल्याने एका आजाराशी झुंजत असताना त्याला एचआयव्हीसारख्या गंभीर आजाराचे संक्रमण झाले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली ( Children HIV Positive After Blood Transfusion )आहे.

सुमित ( बदललेले नाव ) हा चार महिन्याचा असताना त्याला थॅलेसेमियाची लागण झाली. त्याला नागपूरमधील खाजगी ब्लड बँकेंकडून रक्त देत असल्याचे पित्याने सांगितले. मात्र, मागील महिन्यात डॉ. रुघवानी यांच्याकडे रक्त देण्यासाठी गेले असता, सहा वर्षांच्या मुलाला एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले. ज्या दिवशी ही बाब त्यांना माहिती झाली तेव्हा त्यांच्या काळजाचा थरकाप उडाला. काय करावे असे समजत नसताना त्यांनी डॉ. रुघवाणी यांनी आधार दिला.

यावेळी त्या लहान मुलावर उपचार सुरु झाला. आई-वडिलांची चाचणी झाली यात त्यांना एचआयव्ही नसल्याचे समोर आले. रक्त देताना या मुलाला एचआयव्हीचे संक्रमण झाले. मात्र, या मुलांना नॅट टेस्ट ब्लड मिळाले असते, तर या भयावक आजाराचे संक्रमण झाले नसते. त्यामुळे थलेसेमिया आजाराची लागण झालेल्या रुग्णांना शुद्ध आणि संक्रमित नसलेले रक्त मिळावे, अशी मागणी त्या पित्याने केली आहे.

एचआयव्हीची लागण झालेल्या मुलाच्या पित्याची प्रतिक्रिया

दरम्यान, राज्यात बहुतांश रक्त संक्रमण केंद्र आहे. त्यात सरकारी पातळीवर नॅट टेस्ट रक्त तपासण्यासाठी सुविधा उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली. दर 15 दिवसाला थलेसेमियाच्या बालकांना मोफत रक्त द्यावे, असे सरकारचे आदेश आहे. मात्र, हे रक्त तपासताना सरकारी रक्त संक्रमण केंद्रांत नॅट टेस्ट ब्लड सुविधा नाही.

खाजगी रक्तसंक्रमण केंद्रात ही मोजक्याच ठिकाणी रक्त संक्रमण केंद्र आहे. त्यामुळे या सर्व ब्लड केंद्रावरून एचआयव्हीचे संक्रमण होण्याचा ढोका अजून संपलेला नाही. कारण नागपूरच्या एका रुगणालायत चार बालकांना एचआयव्हीची लागण झाली असेल तर राज्यात इतर रुग्णालयात जार संक्रमण तपासणी झाली तर आणखी धक्कादायक बाब समोर येण्याची भीती आहे. त्यामुळे राज्यसरकारनेच या पातळीवर पाऊल आणि तेही कठोर पावले उचलण्याची गरज आहे.

हेही वाचा - Kirit Somaiya : 'अनिल परब गजाआड जातील, सोबत आणखी चौघांचा...'; किरीट सोमैयांचा दावा

Last Updated : May 26, 2022, 9:28 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.