ETV Bharat / city

Fake Gang Rape Nagpur : २५० सीसीटीव्ही फुटेज, १००० पोलिस.. अखेर बलात्काराची 'ती' तक्रारच खोटी! - नागपूर तरुणी बलात्कार खोटी तक्रार प्रकरण

पीडित तरुणीची वैद्यकीय चाचणी ( Medical Test ) करण्यात आली. आरोपींचा शोध देखील सुरू झाला होता. मात्र अचानक तपासात एक धक्कादायक बाब समोर आली. ज्यामुळे पुन्हा पोलीस यंत्रणा हादरून गेली आहे. ज्या तरुणीने स्वतःवर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार दाखल केली होती. ती तक्रातच मुळात खोटी ( Fake Rape Complaint ) असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. प्रियकरासोबत लग्न करायचे असल्याने तिने हा बनवा रचल्याचे स्पष्ट झाले आहे.

नागपूर पोलीस आयुक्त अमितेशकुमार
नागपूर पोलीस आयुक्त अमितेशकुमार
author img

By

Published : Dec 14, 2021, 3:43 PM IST

Updated : Dec 14, 2021, 6:04 PM IST

नागपूर - गाण्याच्या शिकवणीला ( Music Classes ) जात असलेल्या १९ वर्षीय तरुणीचे अपहरण ( 19 Year Old Girl Abduction ) करून दोन आरोपींनी सामूहिक बलात्कार ( Gang Rape ) केल्याची तक्रार आल्यानंतर नागपूरची संपूर्ण पोलीस ( Nagpur Police ) यंत्रणा हादरली होती. या घटनेचे फार वाईट परिणाम होईल, अशी खळबळजनक घटना असल्याने शहर पोलीस आयुक्तांसह सर्व पोलीस अधिकारी आणि त्यांचे पथके तपासकामी लागले होते.

पीडित तरुणीची वैद्यकीय चाचणी ( Medical Test ) करण्यात आली. आरोपींचा शोध देखील सुरू झाला होता. मात्र अचानक तपासात एक धक्कादायक बाब समोर आली. ज्यामुळे पुन्हा पोलीस यंत्रणा हादरून गेली आहे. ज्या तरुणीने स्वतःवर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार दाखल केली होती. ती तक्रातच मुळात खोटी ( Fake Rape Complaint ) असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. प्रियकरासोबत लग्न करायचे असल्याने तिने हा बनवा रचल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रतिक्रिया देतांना पोलीस आयुक्त

अशी झाली पोलिसांची पळापळ

प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी घरच्यांचा होणारा विरोध बघता तक्रार देणाऱ्या तरुणीने बलात्कार झाल्याची खोटी तक्रार पोलिसात नोंदवून पोलिसांना सळो की पळो करून सोडले होते. या संदर्भात पोलीस आयुक्तांनी कोणताही दुजोरा दिला नसला तरी प्रेम प्रकरणातून खोटी तक्रार दिल्याची चर्चा मात्र पोलीस विभागात रंगली आहे. १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटनेची तक्रार येताच संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. घटना वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्याने पोलिसांनी सुमारे 250 पेक्षा अधिक CCTV कॅमेरे पोलिसांनी तपासले. तर अनेक पोलीस ठाण्याचे १००० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आणि त्यांचे पथक तपासकामी सहभागी झाले होते. मुलीची विचारपूस केली. तेव्हा तिने दिलेली माहिती खोटी वाटत आल्याने पोलिसांनी तिला पोलिसी खाक्या दाखवताच बलात्काराची तक्रार खोटी असल्याची कबुली तिने दिली आहे.

हेही वाचा - Husband Killed Wife In Matheran : माथेरान येथे 'त्या' शीर नसलेल्या महिलेची ओळख पटली; पतीच निघाला मारेकरी

Last Updated : Dec 14, 2021, 6:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.