ETV Bharat / city

33 Lakh Job Offer : 15 वर्षीय वेदांत अमेरिकेतून 33 लाखांच्या नोकरीची ऑफर, लहान वय असल्याने नाकारली नोकरी - 15 वर्षीय वेदांत अमेरिकेतून नोकरीची ऑफर

नागपूरमध्ये एका 15 वर्षीय मुलाने गगनभरारी झेप घेतली आहे. मूर्ती लहान पम किर्ती महान असा प्रकार नागपूरमधून समोर आला आहे. 15 वर्षीय वेदांत राजू देवकाते ( 15 year old Vedant Raju Devkate ) याला अमेरिकन कंपनीकडून तब्बल 33 लाख 50 हजारांच्या पॅकेजच्या नोकरीची ऑफर आली आहे. लॉकडाऊनमध्ये त्याने तब्बल 24 ऑनलाइन कोर्सेसचे शिक्षण पूर्ण केले आहे. यामध्ये सी++, जावा, यासह अनेक कठीण कोर्सेसचा समावेश आहे.

15 Year Old Boy
15 वर्षीय वेदांत
author img

By

Published : Jul 23, 2022, 1:27 PM IST

Updated : Jul 23, 2022, 8:25 PM IST

नागपूर - नागपूरच्या रमणा मारुती परिसरात राहणाऱ्या 15 वर्षीय वेदांत राजू देवकाते ( 15 year old Vedant Raju Devkate ) या विद्यार्थ्यांने अशी काही कमाल केली आहे की त्याला या वयात तब्बल 33 लाख 50 हजारांच्या पॅकेजच्या नोकरीची ऑफर मिळाली आहे. वेदांतने लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत घरातील जुन्या लॅपटॉपच्या मदतीने यूट्यूबवर ( Youtube ) सॉफ्टवेअर संबंधित अनेक कोर्सेसचे ( Software Course ) शिक्षण घेतले. मध्यंतरीच्या काळात त्याने सॉफ्टवेअर कोडिंगच्या ऑनलाइन स्पर्धेत ( Software Coding Online Competition ) भाग घेतला. यात त्याने एक हजार सॉफ्टवेअर डेव्हलपरला मात देत ही स्पर्धा जिंकली आहे.

33 लाख 50 हजारांच्या पॅकेजची ऑफर - त्यानंतर वेदांतला त्या कंपनीने नोकरीची ऑफर पाठवली असता वेदांतने इतक्या कमी वयात एवढी मोठी कमाल केली असल्याचे सर्वांच्या समोर आले आहे. आश्चर्य म्हणचे वेदांतच्या या कर्तृत्ववाची साधी माहिती देखील त्याच्या कुटुंबात कुणाला नव्हती. वेदांचे वय फार कमी असल्याने सध्या त्याची ही संधी हुकली असली तरी त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्याला नव्याने ऑफर देणार असल्याचे कंपनीने वेदांतला आश्वासन दिले आहे.

प्रतिक्रिया

अमेरिकेत कोडिंग स्पर्धेची नोंद - जे दिग्गज सॉफ्टवेअर आयटी प्रोफेशनल लोकांना ही जमले नसेल ते काम नागपूरच्या वेदांत देवकाते या 15 वर्षीय शाळकरी विद्यार्थीने करून दाखवले आहे. आईच्या जुन्या लॅपटॉपवर इन्स्टाग्राम ब्राउझ करत असताना त्याला वेबसाइट डेव्हलपमेंट स्पर्धेची माहिती मिळाली. त्याने कुणाला ही न सांगता त्या स्पर्धेत भाग घेतला आणि दोन दिवसांत 2,066 ओळींचे कोडिंग केले आहे. त्याने केलेल्या कोडिंगची दखल अमेरिकेतील एका कंपनीला ( American company ) घ्यावी लागली आहे.

वेदांतच्या कर्तृत्ववाची कुटुंबाला कल्पना नव्हती - वेदांत यावर्षी दहावीत असल्याने त्याचा फोकस हा अभ्यासकडेचं असावा यासाठी त्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आग्रही आहे. दिवसभर शाळा आणि त्यानंतर घरी अभ्यास असा त्याचा दिनक्रम आहे. मात्र,रात्री घरचे झोपल्यानंतर तो यु-ट्यूबच्या मदतीने आपली आवड जोपासत होता. त्याने लॉकडाऊनच्या काळात तब्बल 24 ऑनलाइन कोर्सेसचे शिक्षण पूर्ण केले आहे. यामध्ये सी++, जावा, यासह अनेक कठीण कोर्सेसचा समावेश आहे. ज्यावेळी त्याने ही स्पर्धा जिंकली आणि त्याला 33 लाख रुपयांच्या पॅकेजची ऑफर आली तेव्हा वेदांतच्या कुटुंबियांना त्याच्या मध्ये असलेल्या टॅलेंटची माहिती समजली हे विशेष.

लॉकडाउनच्या वेळेचा सदूउपयोग - वेदांत आठवीत असताना कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन लागले होते. शाळा बंद असल्याने वेदांत घरी अडकून पडला होता. या काळात त्याने आईच्या लॅपटॉपच्या मदतीने तब्बल 24 प्रकारचे ऑनलाइन कोर्सेस पूर्ण केले आहेत.

हेही वाचा - Video : वाघासाठी वाहतूक थांबवली; वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्ग केला मोकळा

Last Updated : Jul 23, 2022, 8:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.