ETV Bharat / city

Dhamma Chakra Promotion Day: १४ ऑक्टोबर हा दिवस आंबेडकरवादी बौद्ध धर्मियांसाठी दिवाळी, दसऱ्याप्रमाणेच

दीक्षाभूमी येथे दरवर्षी १४ ऑक्टोबर हा दिवस भारतीय बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तन दिन (Dhamma Chakra Promotion Day) म्हणून उत्साहाने साजरा करतात. दीक्षाभूमी हे भारतीय बौद्धांचे विशेषतः आंबेडकरवादी बौद्ध (Ambedkarite Buddhists) धर्मीयांचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात पवित्र दीक्षाभूमीसह डॉ. बाबासाहेबांच्या अस्तित्वाच्या अनेक पाऊलखुणा आजही सुरक्षित आहेत. १४ ऑक्टोबर हा बौद्ध धर्मीयांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस असल्याने यावर्षी मोठ्या संख्येने अनुयायी दीक्षाभूमीवर येणार आहेत. (latest news from Nagpur)

Dhamma Chakra Promotion Day
Dhamma Chakra Promotion Day
author img

By

Published : Oct 12, 2022, 4:19 PM IST

नागपूर: दीक्षाभूमी येथे दरवर्षी १४ ऑक्टोबर हा दिवस भारतीय बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तन दिन (Dhamma Chakra Promotion Day) म्हणून उत्साहाने साजरा करतात. दीक्षाभूमी हे भारतीय बौद्धांचे विशेषतः आंबेडकरवादी बौद्ध (Ambedkarite Buddhists) धर्मीयांचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात पवित्र दीक्षाभूमीसह डॉ. बाबासाहेबांच्या अस्तित्वाच्या अनेक पाऊलखुणा आजही सुरक्षित आहेत. १४ ऑक्टोबर हा बौद्ध धर्मीयांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस असल्याने यावर्षी मोठ्या संख्येने अनुयायी दीक्षाभूमीवर येणार आहेत. (latest news from Nagpur)

नागपूरची दीक्षाभूमी

असे झाले ‘दीक्षाभूमी’ नामकरण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या ५ लाख अनुयायांनाही बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. त्यामुळे या पवित्र भूमीला ‘दीक्षाभूमी’ असे नामकरण झाले. दीक्षाभूमीला वर्षभर बौद्ध अनुयायी व पर्यटक भेट देतात. मात्र अशोक विजयादशमी किंवा १४ ऑक्टोबर रोजी यांच्या संख्येनत लक्षणीय वाढ होते.

दीक्षाभूमीचा इतिहास - डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मानवतावादी बुद्ध धर्माची दीक्षा १४ ऑक्टोबर १९५६ला घेतली. ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा घेतली होती. त्या जागेवर सुरुवातीला बाबासाहेबांचा पुतळा उभा करण्यात होता. ती जागा बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पवित्र झाली असल्याची भावना आंबेडकरी अनुयायांची असल्याने ती जागा स्मारकासाठी देण्यात यावी अशी मागणी सातत्याने जोर धरत होती. महाराष्ट्र शासनाने जनभावनेचा आदर राखत दीक्षाभूमीची १४ एकर जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीला दिली. त्यानंतर १९७८ साली स्तूपाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. मात्र, संपूर्ण बांधकाम २००१ साली पूर्ण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने दीक्षाभूमीला 'अ' वर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.