ETV Bharat / city

Ganja Seized : हैदराबाद येथून दिल्लीला गांजा घेऊन निघालेल्या दोन आरोपींना अटक, 16 लाखांचा गांजा जप्त

हैदराबाद येथून दिल्लीला गांजा (Ganja Seized in nagpur) घेऊन निघालेल्या दोन आरोपींना नागपुरात अटक केली आहे. यात 107 किलो गांजा नागपूर पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडला आहे.

Ganja Seized
जप्त केलेला गांजा
author img

By

Published : Feb 9, 2022, 10:11 PM IST

Updated : Feb 9, 2022, 10:28 PM IST

नागपूर - हैदराबाद येथून दिल्लीला गांजा (Ganja Seized in nagpur) घेऊन निघालेल्या दोन आरोपींना नागपुरात अटक केली आहे. यात 107 किलो गांजा नागपूर पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडला आहे. याची किंमत अंदाजे 16 लाख इवढी आहे.

मनोज सीडाम - पोलीस निरीक्षक, अमली पदार्थ विरोधी पथक

अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई -

हैदराबादवरून दिल्लीला निघालेल्या कारमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्याआधारे नागपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. 16 लाख रुपये किमतीचा 107 किलो गांजा जप्त केला आहे. गांजा तस्करी प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, कार देखील जप्त करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, आरोपींनी गांजा तस्करी करण्यासाठी कारच्या सीटखाली विशेष जागा तयार केली होती.

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, हैदराबाद येथून दिल्लीकडे एक कार निघाली आहे, ज्यामध्ये मोठया प्रमाणात गांजा आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने नागपूर-जबलपूर महामार्गावर चेकिंग सुरू केली होती, त्याच दरम्यान ज्या कारची माहिती पोलिसांना मिळाली होती, ती कार आली. पोलिसांनी कारची झडती घेतली तेव्हा कारमध्ये काहीही आढळून आले नाही. मात्र, जेव्हा बारकाईने तपासणी करण्यात आली तेव्हा मागील सीटच्या खाली गांजा लपवून ठेवण्यात आला असल्याचे दिसून आले. पोलिसांनी कारमधील दोघांना लगेच ताब्यात घेऊन गांजा जप्त केला आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या गांजाचे वजन 107 किलो भरले असून, याचा बाजारभाव 16 लाख रुपये इतका आहे.

नागपूर मार्गे देशभरात गांजाची तस्करी:-

उपराजधानी नागपूर शहर हे देशाच्या मध्यभागी आहे. आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यातून गांजा तस्करी करताना नागपूरमार्गेच पुढे जावे लागते. रेल्वेने वाहतूक करायची असली तरी नागपूर मार्गेच जावे लागले. मात्र, रेल्वे स्टेशनवर आरपीएफचे पथक सक्रिय असल्याने गांजा तस्करांनी रस्ते मार्गाने तस्करी करण्याचा कल वाढला असल्याचे दिसून येत आहे.

Last Updated : Feb 9, 2022, 10:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.