ETV Bharat / city

Zaveri Bazaar Bomb : प्रेयसीसोबत झालेल्या वादातून प्रियकराने पोलिसांना दिली बॉम्बची खोटी माहिती - Zaveri Bazaar Bomb Fake Caller arrested

मुंबई पोलिसांनी झवेरी बाजारमध्ये बॉम्ब ठेवल्याचा कॉल (fake call about bomb in Zaveri Bazaar) करून खोटी माहिती देणाऱ्या एका व्यक्तीला अटक (fake caller arrested in Mumbai) केली आहे. दिनेश सुतार (24)असे आरोपीचे नाव आहे, त्याला एलटी मार्ग पोलिसांनी अटक (LT Marg Police Station Mumbai) केली आहे. (Latest crime news from Mumbai)

प्रियकराने पोलीस नियंत्रण कक्षात दिली बॉम्बची खोटी माहिती

author img

By

Published : Sep 20, 2022, 1:03 PM IST

मुंबई : मुंबई पोलिसांनी झवेरी बाजारमध्ये बॉम्ब ठेवल्याचा कॉल (fake call about bomb in Zaveri Bazaar) करून खोटी माहिती देणाऱ्या एका व्यक्तीला अटक (fake caller arrested in Mumbai) केली आहे. दिनेश सुतार (24)असे आरोपीचे नाव आहे, त्याला एलटी मार्ग पोलिसांनी अटक (LT Marg Police Station Mumbai) केली आहे. (Latest crime news from Mumbai)

प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्याचा राग - मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, २४ वर्षीय आरोपी दिनेश सुतार याने मुंबईतील गजबजलेल्या झवेरी बाजार परिसरात बॉम्ब असल्याची खोटी माहिती फोनवरून दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, आरोपीच्या चौकशीत त्याचा प्रेयसीसोबत वाद होऊन ब्रेक अप झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तो संतापला होता. आरोपी दिनेश सुतार हा दक्षिण मुंबईतील काळबादेवी रोड येथील रहिवासी असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. त्याने रविवारी सकाळी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे बॉम्ब ठेवल्याची माहिती (false information about Zaveri Bazar bomb) दिली. काही वेळाने त्यांनी पुन्हा नियंत्रण कक्षात फोन करून झवेरी बाजार परिसरात बॉम्ब ठेवल्याचे सांगितले.

मोबाईल नंबर ट्रेस करून आरोपीचा पत्ता लावला - यानंतर पोलिसांची धावपळ उडाली आणि तत्काळ बॉम्ब शोधक पथक झवेरी बाजार परिसरात पोहोचले. खबरदारी म्हणून, काही मिनिटांतच रस्ता मोकळा करण्यात आला आणि तेथे उपस्थित असलेल्या लोकांना त्या भागापासून दूर राहण्यास सांगण्यात आले, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. यासोबतच पोलिसांनी गुन्हे शाखेचे पथक आणि दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) या फोनची माहिती दिली. त्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने कॉल करण्यासाठी वापरलेला मोबाईल नंबर ट्रेस करून आरोपीचा माग काढला आणि लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी आरोपीला बॉम्बचे ठिकाण जाणून घेण्याच्या बहाण्याने फोन करून पकडले.

आरोपीचा झाला होता नातेवाइकांशी वाद - मुंबई पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी दिनेश सुतार हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील आहे. नातेवाइकांशी वाद होऊन तो दहा दिवसांपूर्वी मुंबईत आला होता आणि काळबादेवी येथेच राहत होता. आरोपींची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.