ETV Bharat / city

#Article 370: मोदी-शाहांनी दिली होती 'ऑफर'; झाकिर नाईकचा खळबळजनक दावा

आर्टिकल 370 हटवल्यानंतर भाजपने समर्थन मिळवण्यासाठी केंद्रातील एका मोठ्या अधिकाऱ्याला चर्चेसाठी पाठवल्याचे झाकिर नाईक याने सांगितले आहे. संबंधित अधिकाऱ्याला गृहमंत्री अमित शाह व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियात बैठकीसाठी पाठवल्याचे तो म्हणाला.

zakir naik speaks on narendra modi and amit shah
झाकिर नाईक याने गृहमंत्री अमित शाह व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केले आहेत.
author img

By

Published : Jan 11, 2020, 12:32 PM IST

Updated : Jan 11, 2020, 1:19 PM IST

मुंबई - आर्टिकल 370 हटवल्यानंतर भाजपने समर्थन मिळवण्यासाठी केंद्रातील एका मोठ्या अधिकाऱ्याला चर्चेसाठी आपल्याला पाठवल्याचे झाकिर नाईक याने सांगितले आहे. संबंधित अधिकाऱ्याला गृहमंत्री अमित शाह व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियात बैठकीसाठी पाठवल्याचे तो म्हणाला. तसेच काश्मीरमधील 370 आर्टिकल हटवण्याच्या समर्थनात भाजपसोबत यावे, अशी 'ऑफर' या अधिकाऱ्याने दिल्याची माहिती झाकिर नाईकने दिली आहे.

झाकिर नाईक याने गृहमंत्री अमित शाह व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केले आहेत.

काश्मीर मुद्द्यावर भारताला समर्थन दिल्यास माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप मागे घेण्यात येतील, असे नाईकने सांगितले आहे. तसेच भारतात परतण्यासाठी मार्ग मोकळा करून देण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्याकडून देण्यात आल्याचे त्याने म्हटले आहे.

सध्या मलेशियात वास्तव्यास असलेल्या डॉ. झाकिर नाईक याने तब्बल पाच मिनिटांचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर प्रसारित केला आहे. यामध्ये त्याने नरेंद्र मोदींसह अमित शाह यांना लक्ष्य केले आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन देण्यासाठी देशभरातील काही मुस्लीम नेते भाजपसोबत असल्याचा खुलासा त्याने केला आहे. मात्र, या नेत्यांना ब्लॅकमेल करण्यात येत असल्याचे तो म्हणाला.

व्हिडिओमध्ये चिथावणीखोर भाषण करून दहशतवादी कारवायांसाठी तरुणांना उकसवणाऱ्या इस्लामिक धर्मप्रचारक झाकिर नाईकने या आधीही अशा प्रकारचे दावे केले होते. इंटरपोलच्या रेकॉर्डवरून त्याची माहिती वगळण्यात आल्याचे त्याने मागील व्हिडीओत सांगितले होते.

Intro:काश्मीरमध्ये 370 अ कलम हटवल्यानंतर यासंदर्भात भाजपाला डॉक्टर झाकिर नाईक याच्याकडून समर्थन मिळावे म्हणून गृहमंत्री अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून एका मोठ्या केंद्रातील एका मोठ्या अधिकाऱ्याला मलेशियात माझ्यासोबत बैठकीसाठी पाठविण्यात आले होते असं डॉ झाकिर नाईक याने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या वतीने हा अधिकारी मला भेटून त्याने काश्मीरमधील 370 अ कलम हटवण्याच्या समर्थनात भाजपासोबत यावे म्हणून ऑफर दिली आहे असा आरोप डॉ जाकीर नाईक याने केला आहे.Body:काश्मीर मुद्द्यावर भारताला समर्थन दिल्यास माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप हे काढून टाकण्यात येतील व भारतात परतण्यासाठी माझ्यासाठी सोपा मार्ग करून दिला जाईल असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याकडून देण्यात आल्याचही डॉक्टर झाकिर नाईक याने म्हटले आहे. याबरोबरच सीएए सारख्या कायद्याला समर्थन देण्यासाठी देशभरातील काही मुस्लीम नेते हे भाजपाच्या सोबत आहेत मात्र त्यांना या संदर्भात ब्लॅकमेल केले जात असून हे न्यायाच्या विरोधात असल्याचे डॉक्टर जाकिर नाईक याने म्हटले आहे. सध्या मलेशिया या देशात वास्तव्यास असलेल्या डॉक्टर झाकिर नाईक याने तब्बल पाच मिनिटाचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर प्रसारित केलेला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करत व वरील व्यक्ती वक्तव्य केलं आहे. Conclusion:दरम्यान , या अगोदरच्या व्हिडिओत चिथावणीखोर भाषण करून आतंकवादी कारवायांसाठी तरुणांना उकसविणाऱ्या इस्लामिक धर्म प्रचारक डॉ झाकीर नाईक याने इंटरपोल च्या रेकॉर्डवरून त्याची माहिती वगळण्यात आल्याचा दावा स्वतः केला होता . इंटरपोल च्या निर्णयाने भारतातील मीडिया व सामान्य माणसाला धक्का लागणे स्वाभाविक आहे मात्र माझ्यावर विविध गुन्हे दाखल करणाऱ्या एनआयए , ईडी या सारख्या तपास यंत्रणांना हा आश्चर्यकारक धक्का म्हणता येणार नसल्याचे झाकीर नाईक याने म्हटले आहे. भारतीय तपास यंत्रणांना त्यांचा राजकीय , व जातीय खेळ इंटरपोल च्या माध्यमातून खेळता आला नसल्याचे झाकीर नाईक याने म्हटले आहे. डॉ झाकीर नाईक गेली 3 वर्षाहून अधिक काळ मलेशियात वास्तव्य करून आहे.
Last Updated : Jan 11, 2020, 1:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.