ETV Bharat / city

मुख्यमंत्र्यांसह पर्यावरण मंत्र्यांबद्दल ट्विटरवर आक्षेपार्ह विधान; गुन्हा दाखल - uddhav thackeray news

गेल्या काही दिवसांपासून समीर ठक्कर या व्यक्तीच्या ट्विटर अकाऊंटवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो अपलोड करीत शिवीगाळ करणारे मजकूर पोस्ट करण्यात आले होते.

CRIME
संग्रहित फोटो
author img

By

Published : Jul 16, 2020, 1:30 PM IST

मुंबई - महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि यांच्यावर सोशल माध्यमांवर वादग्रस्त टिप्पणी करण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून समीर ठक्कर या व्यक्तीच्या ट्विटर अकाऊंटवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो अपलोड करीत शिवीगाळ करणारे मजकूर पोस्ट करण्यात आले होते. १ जुलै रोजी आदित्य ठाकरे यांचा फोटो समीर ठक्करच्या ट्विटरवरून शेअर करण्यात आला होता. ज्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर वापरण्यात आला.

यासंदर्भात युवा सेनेचे कायदे विभागाचे प्रमुख धर्मेंद्र मिश्रा यांनी स्वतः या संदर्भात व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली आहे. या संदर्भांत व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात आयटी अ‌ॅक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला. समीर ठक्कर यास कायदेशीर नोटीस पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.