ETV Bharat / city

मनपा विकासकांशी संधान करून भ्रष्टाचार, योगेश सागर यांचे मुख्यमंत्र्यांना तक्रार पत्र - मुंबई महापालिका तक्रार आमदार योगेश सागर

भारतीय जनता पक्षाचे आमदार योगेश सागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंबई महानगरपालिकेच्या कथित भ्रष्ट कारभाराबाबत तक्रार केली आहे.

Yogesh Sagar letter of complaint to CM
आमदार योगेश सागर पत्र मुख्यमंत्री ठाकरे
author img

By

Published : Jan 8, 2022, 7:31 PM IST

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे आमदार योगेश सागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंबई महानगरपालिकेच्या कथित भ्रष्ट कारभाराबाबत तक्रार केली आहे.

Yogesh Sagar letter of complaint to CM
पत्र

हेही वाचा - Home Isolation New Guideline : होम आयसोलेशनच्या मार्गदर्शक नियमात बदल

मुंबईचा विकास आराखडा मंजूर करताना विविध आरक्षणे प्रस्तावित केली होती. पंरतु, मुंबई महानगर पालिकेच्या भ्रष्ट कारभारमुळे आता उद्याने व खेळाची उद्याने पूर्णपणे नामशेष झाली आहेत. अशा परिस्थितीत मनपाच्या ताब्यातील उद्यानाकरिता आरक्षित, कोणतेही अतिक्रमण नसलेला बांधकाम योग्य भूखंड अजमेरा बिल्डरला देण्यात आला आहे. बदल्यात अजमेरा बिल्डरकडे असणारा बांधकाम अयोग्य व पर्यावरणविषयक परवानग्याच्या कचाट्यात अडकणारा भूखंड मुंबई महापालिकेने माहुल पम्पिंग स्टेशनकरिता ताब्यात घेतल्याची तक्रार आमदार योगेश सागर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

या आदला बदलीच्या प्रस्तावावर सभागृहात कोणतीही चर्चा न करता मंजूरी कशाप्रकारे देण्यात आली? याचा अर्थ ही आदलाबदल फक्त भूखंडाचे श्रीखंड चाखण्यासाठीच केली गेली का? असे प्रश्न योगेश सागर यांनी आपल्या पत्रातून मुख्यमंत्र्यांना विचारले आहेत. तसेच, या ५०० कोटींच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्वरीत स्थगितीचे आदेश निर्गमित करावे, अन्यथा योग्य त्या कायदेशीर बाबींचा मार्ग स्वीकार करण्याचा इशाराही योगेश सागर यांनी दिला आहे.

हेही वाचा - सीएसएमटी-कुर्ला स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा पोलिसांना निनावी फोन; आरोपीला जबलपूर येथून अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.