ETV Bharat / city

येस बँक घोटाळा : राणा कपूरची पत्नी आणि मुलींची भायखळा कारागृहात रवानगी - येस बँक आणि डीएचएफएल बातमी

येस बँकेमधील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राणा कपूर यांचा संपूर्ण परिवार संशयाच्या भोवऱ्यात आहे. कपूर यांची पत्नी बिंदू, मुली राधा आणि रोशनी यांचा जामीन सीबीआय न्यायालयाने नाकारला असून तिघांचीही भायखळा कारागृहात रवानगी केली आहे.

Yes bank scam
येस बँक घोटाळा
author img

By

Published : Sep 28, 2021, 7:03 PM IST

मुंबई - येस बँक घोटाळा प्रकरणी बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची पत्नी व मुलींना सीबीआय न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. तपास यंत्रणेच्या आरोपपत्रात कपूरची पत्नी बिंदू आणि मुली राधा खन्ना आणि रोशनी यांना आरोपी बनवण्यात आले आहे. कपूर यांची पत्नी व मुलींनी जामिनासाठी अर्ज केला होता. सीबीआय न्यायालयाने जामीन अर्ज नाकारला असून तिघांचीही भायखळा कारागृहात रवानगी केली आहे.

भायखळा कारागृहात रवानगी
येस बँकेमधील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राणा कपूर यांचा संपूर्ण परिवार संशयाच्या भोवऱ्यात आहे. राणा कपूर यांची पत्नी बिंदू कपूर, त्यांच्या तीन मुली राखी, रोशनी आणि राधा यांच्या नावावर अनेक कंपन्या असल्याचे संक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीत समोर आले आहे. तपास यंत्रणेच्या आरोपपत्रात कपूरची पत्नी बिंदू आणि दोन मुलींना आरोपी बनवण्यात आले आहे. या आरोपपत्राची दखल घेत सीबीआय न्यायालयाने या तिघांनाही समन्स बजावले होते. मात्र, या तिघींनीही आपली बाजू न्यायालयात मांडली. आणि वकील विजय अग्रवाल आणि राहुल अग्रवाल यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. मात्र, न्यायालयाने राणा कपूर यांची पत्नी व मुलींना जामीन देण्यास विशेष न्यायालयाने नकार देत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता या तिघींचीही भायखळा कारागृहात रवानगी केली आहेत.

हेही वाचा - कन्हैया कुमारांसह जिग्नेश मेवानी यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

जामीन देण्यास नकार
कपूर यांची पत्नी बिंदू, मुली राधा आणि रोशनी यांच्या बेकायदा कृतीमुळे बँकेला चार हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे त्यांना महिला आणि लहान मुलांची आई असल्याने सहानुभूती दाखवण्याचा प्रश्नच येत नाही. येस बँक आणि डीएचएफएलचे अनेक ठेवीदार आणि भागधारकांची फसवणूक झाली. परिणामी देशाच्या बँकिंग व्यवस्थेला गंभीर फटका बसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला.

हेही वाचा - दिल्लीमध्ये अमित शाह यांची कॅप्टन भेट घेणार का ? ट्विट करून अमरिंदर यांनी दिले स्पष्टीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.