ETV Bharat / city

Maharashtra Weather Forecast विदर्भात येलो अलर्ट, महाराष्ट्रात ४८ तासांसाठी हवामानाचा इशारा - Maharashtra Weather Forecast

विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता Heavy Rain in Vidarbha हवामान विभागाकडून Yellow Alert in Vidarbha वर्तवण्यात आली आहे. याच काळात पुणे शहर व जिल्ह्यातही तुरळक पावसाची शक्यता आहे, असे हवामान विभागाने India Meteorological Department म्हटले Meteorologist K S Hosalikar आहे. Heavy Rain in Maharashtra राज्यात पुढील दोन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. पुढील 48 तासांसाठी हवामान विभागाने इशारा दिला आहे.

Maharashtra Weather Forecast
महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज
author img

By

Published : Aug 25, 2022, 9:28 AM IST

Updated : Aug 25, 2022, 11:06 AM IST

मुंबई महाराष्ट्रात विदर्भात मुसळधार पावसाची Heavy Rain in Vidarbha शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पुढील दोन दिवस हवामान विभागाने विदर्भात येलो अलर्ट सांगितला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता Warning For 48 Hours in Maharashtra वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता वादळात रूपांतरित झाल्याचे आढळून आले होते. त्यामुळे राज्यात मागील दोन ते तीन दिवस मध्यम ते मुसळधार Heavy Rain in Maharashtra पाऊस झाला होता. हवामान खात्याने India Meteorological Department हा अंदाज व्यक्त केला आहे. याच काळात पुणे शहर व जिल्ह्यातही तुरळक पावसाची शक्यता आहे, असे हवामान विभागाने Meteorologist K S Hosalikar म्हटले आहे.

  • 24/08: महाराष्ट्रात ४८ तासांसाठी हवामानाचा इशारा pic.twitter.com/WsxTQF0aMb

    — K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राज्यात आत्तापर्यंत पावसाचे प्रमाण समाधनाकारक दरम्यान, राज्यात आत्तापर्यंत पावसाचे प्रमाण समाधनाकारक राहिले आहे. जूनपासून आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. नदी आणि धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. मात्र, जुलै आणि ऑगस्टमध्ये राज्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली होती. दरम्यान, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात मुसळधार पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यानं वाहतुकीवरही परिणाम झाला होता. तसेच शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे.

कोल्हापूर पाऊस कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात हलक्या सरींनी हजेरी लावली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पावसाने हजेरी लावल्याने राधानगरी धरणाचा स्वयंचलित 6 व्या क्रमांकाचा दरवाजा उघडला आहे. राधानगरी धरणातून एकूण 3 हजार 28 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पातळी 18 फूट 11 इंचापर्यंत खाली आली आहे. जिल्ह्यातील अजूनही 12 बंधारे पाण्याखाली आहेत. दरम्यान, राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा या पावसाचे आगार असणाऱ्या तालुके सोडून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळं जिल्ह्यातील पुराचे संकट टळले आहे.

पावसाचा अंदाज काय संपूर्ण मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांत अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस पडण्याचा अंदाज माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. याव्यतिरिक्त पुढील आठवडाभर म्हणजे सोमवारपर्यंत 29 ऑगस्ट पावसाची उघडीप मिळू शकते असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील खान्देश ते सोलापूर पर्यंतच्या 10 जिल्ह्यांत आजपासून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसा व्यतिरिक्त उघडीपच जाणवेल अशी माहिती ही खुळे Meteorologist Manikrao Khule यांनी दिली आहे.

पुणे घाटमाथ्यासह विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज सह्याद्रीतील घाटमाथ्यावरील नद्या उगम आणि धरण पाणलोट क्षेत्रात मात्र मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता अजुनही कायम असल्याचे खुळे यांनी सांगितले. नद्या आणि कॅनॉल पात्रातील सध्या होत असलेला सततचा पाणी विसर्ग कायम व नियंत्रणात ठेवण्याचे कार्य सिंचन विभागाला चालूच ठेवावे लागेल, अशी स्थिती दिसत आहे. दरम्यान, कोकणातील 4 जिल्ह्यात पुढील 3 दिवस जोरदार पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान विभागानं सांगितले आहे. विदर्भात पुढील 3 दिवस तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शुक्रवारपासून 26 ऑगस्ट पुन्हा तिथे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता जाणवत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

हेही वाचा Daman river धक्कादायक, जीव धोक्यात घालून रहिवाशांना करावी लागते दमण नदी पार

Last Updated : Aug 25, 2022, 11:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.