ETV Bharat / city

Ganeshotsav 2022 : आज विसर्जनादरम्यान दुहेरी धोका, पावसाचा यलो अलर्ट

मुंबईत शुक्रवार ते रविवार ३ दिवस पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे.आज शुक्रवारी ढगाळ वातावरण राहणार आहे.आज दिवसातून दोन वेळा समुद्राला मोठी भरती (High tide in the sea) असल्याने यामुळे गणेश विसर्जनाला (Ganesh visarjan) जाणाऱ्या भाविकांना पाऊस आणि समुद्राची भरती असा दोन प्रकारचा धोका (Danger) असणार आहे.

Ganpati visarjan
गणपती विसर्जन
author img

By

Published : Sep 9, 2022, 10:16 AM IST

मुंबई - मुंबईत शुक्रवार ते रविवार ३ दिवस पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert For Rain) देण्यात आला आहे. मुंबईत गेले दोन दिवस सायंकाळी जोरदार पाऊस पडत आहे. आज शुक्रवारी ढगाळ वातावरण राहणार आहे. शहर आणि उपनगरात काही ठिकाणी थंड वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर आज दिवसातून दोन वेळा समुद्राला मोठी भरती (High tide in the sea) असल्याने यामुळे गणेश विसर्जनाला (Ganesh visarjan) जाणाऱ्या भाविकांना पाऊस आणि समुद्राची भरती असा दोन प्रकारचा धोका (Danger) असणार आहे.

इतका पडला पाऊस - मुंबईमध्ये शुक्रवार ते रविवार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. या दरम्यान जोरदार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बुधवार आणि गुरूवारी सायंकाळी जोरदार पाऊस पडला. गेल्या २४ तासात शहर विभागात ३४.८६, पूर्व उपनगरात ६१.८३ तर पश्चिम उपनगरात ६५.९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे काल कुर्ला, नाहूर, भांडुप आदी ठिकाणी रुळावर पाणी साचल्याने रेल्वे सेवेवर परिणाम झाला होता. काल रात्री लोकल ट्रेन २० ते २५ मिनिट उशिराने धावत होत्या. आज सकाळी रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे.

समुद्राला मोठी भरती - मुंबईच्या समुद्रात सकाळी ११.१६ वाजता ४.५२ मीटर तर रात्री ११.२७ वाजता ४.२५ मिटरची भरती असणार आहे. या दरम्यान समुद्रात उंच लाटा उसळणार असून यावेळी भाविक आणि पर्यटकांनी समुद्रात जाऊन नये. आपली काळजी घ्यावी असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.