ETV Bharat / city

Mamta Banarjee on Mumbai Visit : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उद्या मुंबई दौऱ्यावर

पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Cm Mamta Banarjee) उद्या मुंबई दौऱ्यावर (Mumbai visit) येत आहेत. विशेष म्हणजे मुंबई दौऱ्यात बॅनर्जी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharshtra Cm Uddhav Thackreay) व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad PAWAR) यांची भेट घेणार असल्याचे समजते.

Mamta Banarjee on Mumbai Visit
Mamta Banarjee on Mumbai Visit
author img

By

Published : Nov 29, 2021, 10:47 PM IST

मुंबई - पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Cm Mamta Banarjee) उद्या मुंबई दौऱ्यावर (Mumbai visit) येत आहेत. विशेष म्हणजे मुंबई दौऱ्यात बॅनर्जी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharshtra Cm Uddhav Thackreay) व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad PAWAR) यांची भेट घेणार असल्याचे समजते. परंतु संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने शरद पवार सध्या दिल्लीत आहेत त्या कारणाने ही भेट होईल की नाही याबाबत अद्याप निर्णय झाला नाही आहे. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ते रुग्णालयात जाऊन अवश्य भेट घेणार आहेत. ममता बॅनर्जी यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.

ममता बॅनर्जी उद्या सायंकाळी मुंबईत पोहोचत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर परवा १ डिसेंबर रोजी ममता बॅनर्जी एका महत्त्वाच्या बिजनेस मिटसाठी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हजेरी लावणार आहेत. त्याच बरोबर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या रिसेप्शन कार्यक्रमाला सुद्धा त्या हजेरी लावणार असल्याचे समजते. २ डिसेंबर रोजी त्या पुन्हा कोलकत्त्याला रवाना होणार आहेत.

पक्षाच्या विस्तारासाठी महत्त्वाच्या नेत्यांबरोबर भेटीगाठी
विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी यांचे काँग्रेससोबतचे संबंध चांगले राहिलेले नाहीत. सध्या त्या पक्षाच्या विस्तारात व्यग्र आहेत. गेल्या दिल्ली दौऱ्यात ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती, मात्र या दौऱ्यात ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतलेली नाही हे विशेष. सध्या आपण पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खूपच व्यग्र असल्याने सोनिया गांधी यांची भेट घेतली नसल्याचे त्या म्हणाल्या होत्या.ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. त्यासोबतच त्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वाही आहेत. त्यामुळे हा दौरा आणि या भेटीला महत्त्व आले आहे.

काँग्रेससोबत संबंध ताणले
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत एकहाती मिळालेल्या विजयामुळे ममता बॅनर्जी यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे सध्या त्या पश्चिम बंगाल बाहेरही त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्याच्या विचारात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गोव्यातही त्यांनी पक्षविस्ताराचा प्रयत्न सुरु केला आहे. याशिवाय काँग्रेसमधील नाराज नेत्यांनाही त्यांनी आपल्या पक्षात प्रवेश घ्यायला सुरु केला आहे. बऱ्याच काँग्रेस नेत्यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. पाठिमागील काही दिवसांपासून त्यांचे काँग्रेस पक्षासोबत संबंध बिघडले असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर; शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घेणार भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.