मुंबई - प्रेमात अपयश.. शाळेच्या परीक्षेत कमी गुण पडणे.. एकलकोंडेपणा, न्यूनगंड, कुटुंबीयांकडून होणारा छळ किंवा दुर्लक्ष, व्यसन या गोष्टींचा सामना करावा लागला, की सर्वप्रथम डोक्यात एकच विचार येतो तो म्हणजे ‘आत्महत्येचा’. मानसिक ताणतणाव हे त्यामागचे प्रमुख कारण असते.
'जीवन संपविण्याचा नकारात्मक विचार मनात सतत घोळत राहिल्यानंतर थेट आत्महत्या केली जाते'
आत्महत्येपासून व्यक्तीला परावृत्त करणे महत्त्वाचे असून, आत्महत्येतील प्रकार लक्षात घेण्याची गरज असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. जीवन संपविण्याचा नकारात्मक विचार मनात सतत घोळत राहिल्यानंतर थेट आत्महत्या केली जाते, हा एक प्रकार आहे. तर काही जण इतरांचे केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी जीविताला हानी होणार नाही, हे लक्षात घेऊन आत्महत्येचा फक्त प्रयत्न करतात. हा दुसरा प्रकार आहे. या दोन्ही प्रकारांतील गांभीर्य ओळखणे गरजेचे असून, प्रयत्न करणारी आणि खरंच जीवनाला वैतागलेली व्यक्ती लक्षात घेणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांत कुटुंबातील, मित्रांतील, आप्तेष्टांतील संवाद कमी होत असून, अपुऱ्या संवादामुळे नैराश्य वाढत असलेल्या रुग्णांमध्ये सध्या वाढ होत आहे. आत्महत्येसाठी नैराश्य आणि स्क्रिझोफ्रेनिया हे आजार मुख्य कारण ठरत आहेत. स्क्रिझोफ्रेनियाने ग्रस्त ५० टक्के रुग्ण आत्महत्येचा प्रयत्न करतात. त्यातील १५ टक्के रुग्णांचा जीव जातो. यासोबत व्यसन हादेखील मानसिक आजार असून, नशेत आत्महत्येचा विचार करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मानसोपचार
लोकांच्या मनात आत्महत्येचा विचार का येतो?
- एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचा विचार येणं किंवा त्याने आत्महत्येची कल्पना करणं, याला मानसोपचारतज्ज्ञ 'सुसाइट आयडिएशन' म्हणतात.
- मनात आत्महत्येची कल्पना येण्यास एकच कारणं कारणीभूत नसतं. आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याआधी घडलेली घटना निमित्तमात्र असू शकते. त्याक्षणी, जीवन संपवणं हा एकच मार्ग त्या व्यक्तीला दिसतो, असं तज्ज्ञ म्हणतात.मानसोपचार तज्ज्ञ सांगतात की, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात निदान एकदातरी आत्महत्येचा विचार येत असतो. मात्र कौंटुबिक वातावरण व मानसिक स्थितीनुसार हा विचार प्रबल होत असतो. एक व्यक्ती अनेक वेळा आत्महत्येचा प्रयत्न करत असते. नशेत अनेकदा त्यांच्याकडून आत्महत्येचा प्रयत्नदेखील होतो. मात्र, नशा उतरल्यास चुकीचे काही तरी करत असल्याची जाणीव त्यांना होते, असे अनेक निरीक्षणातून समोर आल्याचे मानसोपचारतज्ज्ञ सांगतात.
आत्महत्येबद्दल कोणी बोलत असेल तर काय करावे -
- तणावग्रस्त व नैराश्येत असणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे आपुलकीने ऐकावे.
- मानसोपचार तज्ज्ञ, डॉक्टर समुपदेशक यांची मदत घ्यावी.
- आत्महत्या रोखण्यासाठी कार्यरत हेल्पलाईनवर संपर्क करावा.
आत्महत्येचा विचार करणाऱ्या व्यक्तींची लक्षणे -
- मृत्यू किंवा आत्महत्येविषयी विचार करणे किंवा लिहिणे.
- निराश, हतबलता अथवा किंमत नसल्याची भावना बोलून दाखविणे.
- चिंताग्रस्त, संतापलेपणा, सत्तत बदलणारा मूड किंवा बेफिकिरी
- निरोपाची भाषा, अमली पदार्थाचे सेवन.
आत्महत्या प्रतिबंधासाठी खालील गोष्टी करा -
- मानसिक दडपण किंवा ताण-तणाव आल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
- जवळच्या व्यक्तीशी व कुटूंबियांशी मनमोकळा संवाद ठेवा
- आभासी दुनियेतील वावरापेक्षा प्रत्यक्षात मित्र-मैत्रिणींच्या सहवासात राहा
- मानसिक आजारांवर सकारात्मक चर्चा करा -
मानसोपचार तज्ज्ञ सांगतात की, आत्महत्येचा विचार म्हणजे, तात्पुरती मानसिक अवस्था असते. त्या वेळी त्या व्यक्तीला मानसिक आधाराची फार गरज असते. तर कोणी व्यक्ती आत्महत्येबाबत विचार व्यक्त करत असेल तर त्याचे समुपदेशन गरजेचे आहे. नैराश्ये असणाऱ्या व्यक्तीशी कायम संवाद साधणे गरजेचे आहे.
आत्महत्येच्या विचारातून बाहेर पडण्यासाठी मार्ग काय?
आत्महत्येच्या विचारातून बाहेर येण्यासाठी सुसाइड हेल्पलाईनची मदत, समुपदेशन, सकारात्मक विचार आणि वैद्यकीय मदत हे मार्ग आहेत.
तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत असल्यास खालील समुपदेशन केंद्रांशी संपर्क साधा -
‘कनेक्टिंग’ एनजीओ - हेल्पलाईन नंबर १८००२०९४३५३ अथवा ९९२२००११२२
हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019
इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
जीवन हे एकदाच मिळतं. मात्र मिळालेल्या आयुष्याचं सोने करणं हे आपल्या हातात असतं. आयुष्यात चढ उतार होत असतात. अनेक जण आलेल्या संकटाला तोंड देतात. तर अनेक जण संकटांमुळे खचून जातात. काहीजण डिप्रेशनमध्ये जातात. डिप्रेशन मध्ये गेल्यानं आयुष्य आपलं संपला आहे अशाच भावना त्या व्यक्तीच्या मनामध्ये येऊ लागतात. अशा अनेक कारणांमुळे काहीजण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. आत्महत्या करण हा काही उपाय नाही. सिने जगतामध्ये देखील असे काही कलाकार येत आहेत ज्यांचा अभिनय बघून अनेकांना स्फूर्ती मिळाली आहे. मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात निर्माण झालेल्या वादळामुळे त्यांनी आपलं जीवन संपवलं. आज अपण काही कलाकार पाहणार आहोत ज्यांनी कमी वयात जगाचा निरोप घेतला. तसंच याविषयी आपण माणूस उपचार तज्ञांचे देखील मत जाणून घेणार आहोत.
सुशांत सिंह राजपूत -
सुशांत सिंह राजपूतचे फिल्मी करिअर हे स्वप्नासारखं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. ते का लहान शहरातून येतो. मुंबईमध्ये राहतो आणि आपल्या करिअरला सुरुवात करतो. 2010 मध्ये एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेत तो अभिनय करतो. फक्त सिरीयल हेच आपलं कार्यक्षेत्र त्याने ठेवले नाही. पुढे हाच सुशांत सिंह राजपूत 2013 मध्ये 'काई पो छे' या सिनेमात लीड रोल करताना दिसला. नीरज पांडे यांनी कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी याच्यावर एक बायोपिक तयार केला. यामध्ये महेंद्रसिंह धोनीची व्यक्तिरेखा सुशांत सिंह राजपूत याने हुबेहूब साकारली. सुशांतने अनेक सिनेमे केले यामध्ये छिछोरे, सोनचिडिया, केदारनाथ, डिटेक्टिव ब्योमकेश बक्शी, पीके या सिनेमांचा समावेश आहे. या सिनेमामध्ये त्यांनी जो अभिनय केलाय त्याच्या अभिनय कौशल्याचं एक उत्तम उदाहरणच म्हणावं लागेल. 14 जून 2020 रोजी सुशांतचा मृतदेह राहत्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या बातमीनंतर संपूर्ण देशामध्ये सुशांत सिंहची आत्महत्या की हत्या यावर अनेक चर्चा रंगल्या. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे आहे. तपासाचाचा अंतिम रिपोर्ट अद्याप आलेला नाही.AIIMS जो रिपोर्ट दिला आहे. त्या रिपोर्टनुसार सुशांत आत्महत्या केली आहे.
प्रत्युषा बॅनर्जी -
'बालिका वधू’ या मालिकेचं नाव काढलं की आठवतो तो प्रत्युषा बॅनर्जीचा चेहरा. या मालिकेत प्रत्युषानं मोठ्या आनंदीची भूमिका साकारली होती. पण दुर्दैवानं प्रत्युषा आज आपल्यात नाही. 1 एप्रिल 2016 रोजी प्रत्युषा हे जग सोडून गेली. कथितरित्या आत्महत्या करत प्रत्युषानं आयुष्य संपवलं. मात्र तिच्या आईवडिलांच्या मते, प्रत्युषाची आत्महत्या नसून हत्या आहे. प्रत्युषाला जाऊन उणीपुरी 5 वर्षे झाली आहेत आणि आजही तिच्या मृत्यूचं रहस्य उलगडलेलं नाही. तिचे आई बाबा आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
दिव्या भारती -
दिव्या भारतीची वेगळी ओळख सांगायला नको. अतिशय कमी वयात बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि रातोरात रुपेरी पडद्यावर ती स्टार झाली. दिवानासह अनेक सिनेमांमध्ये दिव्या भारतीने मुख्य नायिकेचा रोल केला होता. मात्र वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. दिव्या भारतीचे जाणं हे आज ही एक रहस्य आहे. कमी वयात तिने यशाच्या पायऱ्या चढल्या होत्या. शोला और शबनम सारखे हिट सिनेमे 90 च्या दशकात बॉलिवूडला दिले होते. दिव्या भारतीच्या इमारतीमध्ये राहायची त्याच इमारतीमधून उडी घेऊन तिने आपले जीवन संपवले.
कुशल पंजाबी -
बॉलीवूड आणि छोट्या पडद्यावरचा मोठा कलाकार म्हणून कुशल पंजाबीची ओळख होती. 23 एप्रिल 1977 या दिवशी कुशल पंजाबीचा जन्म एका सिंधी कुटुंबात झाला. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात कुशल पंजाबी जगाचा निरोप घेतला. सुशांत सिंह राजपूत प्रमाणेच त्याने आपल्या घरी आत्महत्या केली. कुशल पंजाबीचा मित्र चेतन हंसराज याने तेव्हा प्रसारमध्यमांना माहिती दिली होती की, कुशल हा डिप्रेशनमध्ये होता आणि त्यामुळेच त्याने आत्महत्या केली. कुशल पंजाबी ना आपल्या कारकीर्दीत 20 पेक्षा जास्त टीव्ही शो केले आहेत. 5 सिनेमांमध्ये काम केलेला आहे. काही म्युझिक व्हिडिओ आणि जाहिरातींमधून देखील कुशल पंजाबी झळकला होता. त्याच्या आत्महत्येची बातमी समजल्यानंतर त्याच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसला होता.
जिया खान -
जिया खान बॉलीवूडमध्ये एक उगवता तारा होता. तिचा पहिला सिनेमा होता 'निशब्द' या पहिल्याच सिनेमात तिने काम केलं ते या शतकाचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत. 2007 मध्ये तिनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. करिअरची सुरुवात झाली आणि 2016 मध्ये जिया खानने आत्महत्या केली. जेव्हा तिने आत्महत्या केली तेव्हा तिचं वय 25 वर्ष होतं. गजनी सारख्या सुपरहिट सिनेमात तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. तिने हाऊसफुल सारखा हिट सिनेमा देखील दिला होता. सिनेमे हिट होत होते मात्र तरीही ती कुठल्यातरी तणावाखाली असल्याचं जाणकारांचं म्हणणं होत.
सिल्क स्मिता -
80 आणि 90 च्या दशकांमध्ये तरुणांच्या गळ्यातलं ताईत झाली ती सिल्क स्मिता. दाक्षिणात्य सिनेमांमध्ये तिनं आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. तिच्या मादक सौंदर्यामुळं अनेक जण घायाळ होत होते. गरीब कुटुंबात जन्म घेतलेल्या सिल्क स्मिता हिच्या आयुष्यावर बॉलिवूडमध्ये एक सिनेमा बनवला होता. त्या सिनेमाचं नाव होतं द डर्टी पिक्चर. या सिनेमामध्ये सिल्क स्मिताने केलेला स्ट्रगल व तिच्या आयुष्यातले चढ-उतार, तिचा स्टारडम हे सगळं दाखवले होते. अचानक एक दिवस सिल्क स्मिता तिच्या चेन्नईतल्या आपारमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आली.