ETV Bharat / city

जागतिक सायकल दिनानिमित्त 'सायकल चालवा शहर वाचवा' चा नारा - Shiv Sahyadri Aikyavardhak Samajik Seva Sanstha, Mumbai

जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधत शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्थेतर्फे बेलापूर महापालिका मुख्यालयापासून ते नवी मुंबई शहरापर्यंत 'सायकल चालवा शहर वाचवा' चा नारा देत सायकल रॅली काढण्यात आली होती.

जागतीक सायकल दिन
जागतीक सायकल दिन
author img

By

Published : Jun 4, 2021, 10:54 AM IST

नवी मुंबई - जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधत शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्थेतर्फे बेलापूर महापालिका मुख्यालयापासून ते नवी मुंबई शहरापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली होती. यात सायकल चालविण्याचे फायदे सांगत जनजागृतीही करण्यात आली आहे. सद्यस्थितीत सायकल चालविणे किती महत्वाचे आहे, याची देखील माहिती सांगण्यात आली आहे.

सायकल चालवा शहर वाचवा

फिटनेस टिकण्यासाठी सायकल चालविणे गरजेचे

कोरोनाच्या महामारीत कोरोनापासून बचाव करताना आपले आरोग्य टिकून राहण्यासाठी 'सायकल चालवा शहर वाचवा' असा संदेश देण्यात येत आहे. नवी मुंबईतील शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्थेतर्फे सायकल चालविण्याविषयी अधिक जणजागृती व्हावी, तसेच पर्यावरण शुध्द राहावे यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

बेलापूर मुख्यालयापासून रॅलीला सुरवात

बेलापूर येथील नवी मुंबई पालिकेच्या मुख्यालयापासून या रॅलीची सुरुवात करण्यात आली होती. संपूर्ण शहरात ही रॅली काढण्यात आली होती. यावेळी एनआरआय पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, कार्याध्यक्ष वर्षा भोसले तसेच इतर सायकलप्रेमी उपस्थित होते. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून ही रॅली यशस्वीपणे पार पडली आहे.

हेही वाचा - बारावी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करणार? शिक्षण तज्ञांनी उपस्थित केला प्रश्न

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.