मुंबई - शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात महिलेने बलात्काराची लेखी तक्रार साकीनाका पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे. अद्याप राहुल शेवाळे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र महिलेने तक्रार केल्याने राहुल शिवाळे यांच्या अडचणी वाढल्या आहे.
अद्याप गुन्हा दाखल नाही - खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात महिलेने लेखी तक्रार दाखल केली असून या प्रकरणात पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहेत. महिलेकडून करण्यात आलेली तक्रारीची संदर्भात संपूर्ण चौकशी केल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या संदर्भात खासदार राहुल शेवाळे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. मात्र आता भाजपाला राज्य सरकार विरोधात पुन्हा एक मुद्दा हाती आल्याने सरकारला घेरण्याचा प्रयत्न होण्याची देखील शक्यता आहे.
मुंडे, नाईकनंतर शेवाळे - याआधी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधातही एका महिलेने बलात्काराच्या प्रकरणाची धमकी देत पाच कोटी रूपयांची मागणी केली होती. जर मागणी पूर्ण झाली नाही तर बलात्काराचे प्रकरण पुन्हा बाहेर काढेन असेही महिलेने म्हटले होते. मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. तर सध्या आमदार गणेश नाईक यांच्यावर देखील याचसंदर्भातील गुन्हा दाखल झाला आहे.