मुंबई - भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांना अटक करा या मागणीसाठी देशाच्या विविध भागात मुस्लिम सामाजाकडून निदर्शने करण्यात येत आहेत. नुपूर शर्मा यांनी प्रेषित मंहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले ( Nupur Sharma controversial remarks on Prophet Muhammad ) होते. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी महिलांनी निदर्शने केली आहेत. नवी मुंबईत महिलांनी निषेध मोर्चा दरम्यान सोलापूर येथेही महिलांनी मोर्चा काढला आहे.
मोठा जनसमुदाय रस्त्यावर - नुपूर शर्मा त्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात दिल्लीतील जामा मशिदीत निदर्शने करण्यात आली होती. मुस्लीम समाजातील लोकांनी शुक्रवारच्या नमाजनंतर ही निदर्शने केली होती. आज नुपूर शर्मा त्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात नवी मुंबईमध्ये आंदोलन करण्यात येत आहे. ज्यात मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता.