ETV Bharat / city

Maharastra politics: उद्धव ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर समता पक्षाचा आक्षेप, घटना तज्ज्ञांचे काय आहे मत? - Maharastra politics

शिवसेना गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे" पक्ष हे नाव देण्यात आल असून, या पक्षासाठी धगधगती "मशाल" ही निशाणी देण्यात आली आहे. मात्र समता पक्षाने यावर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने आपल्याला ही निशाणी दिली होती असा दावा केला आहे.उद्धव ठाकरे यांना 'मशाल' चिन्ह दिल्यानंतर त्यावर कोणालाही दावा सांगता येणार ( No one can claim on Mashal symbol ) नाही, असं मत घटना तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Maharastra politics
मशाल चिन्ह उद्धव ठाकरे
author img

By

Published : Oct 12, 2022, 1:38 PM IST

मुंबई : शिवसेना गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे" पक्ष हे नाव देण्यात आल असून, या पक्षासाठी धगधगती "मशाल" ही निशाणी देण्यात आली आहे. मात्र समता पक्षाने यावर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने आपल्याला ही निशाणी दिली होती असा दावा केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समता पक्ष केंद्रीय निवडणूकआयोगाकडे चिन्हाचा मागणी करणार आहे. तसेच यासाठी न्यायालयात जाण्याची ही तयारी त्यांच्याकडून दर्शवण्यात आली आहे. तर दुसरीकडे केंद्रीय निवडणूक ( Central Election Commission ) उद्धव ठाकरे यांना 'मशाल' चिन्ह दिल्यानंतर त्यावर कोणालाही दावा सांगता येणार नाही ( No one can claim on Mashal symbol ), असं मत घटना तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मशाल चिन्हावर आक्षेप - "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे" पक्षा समोरच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. दोन दिवसापूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे" असे त्यांच्या पक्षाला नाव दिलं असून धगधगती 'मशाल' हे चिन्ह त्यांना देण्यात आल आहे. या मशालीच्या चिन्हावर अंधेरी पूर्व येथे होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे आपल्या पक्षाला घेऊन पहिली निवडणूक लढवणार होते. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिलेल्या मशाल चिन्हावर समता पक्षाने आक्षेप घेतला आहे.

1996 साली समता पक्षाला मशाल चिन्ह - समता पक्षाला या आधी धगधगती मशाल हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं होतं. मात्र सध्या समता पक्ष हा राजकारणात सक्रिय नाही. त्याचात 2004 च्या नंतर समता पक्षाने कोणतेही निवडणूक लढवलेली नाही. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने समता पक्षाला दिलेलं मशाल चिन्ह गोठवलं होतं. मात्र आता समता पक्षाकडून पुन्हा एकदा मशाल चिन्हावर दावा समता पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष तृणेश देवळकर यांनी केला आहे. 1994 साली समता पक्षाची निर्मिती झाली. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने 1996 साली मशाल हे चिन्ह समता पक्षाला दिलं होतं. मात्र निवडणुकीत सक्रिय नसल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने समता पक्षाचे मशाली चिन्ह 2004 सालीत गोठवल आहे. त्यामुळे गोठवलेल्या चिन्हावर पुन्हा एकदा मूळ पक्षाला दावा करता येतो का ? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

दोन्ही गटांचे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपाचे - एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये सुरू असलेल्या राजकीय संघर्षामुळे पक्षाचे शिवसेना हे नाव आणि निशाणी धनुष्यबाण केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठावली. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक लागल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाला पक्षाचं शिवसेना नाव आणि निशाणी धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय घ्यावा लागला. मात्र दोन्ही गटाला देण्यात आलेले पक्षाचे नाव आणि चिन्ह हे तात्पुरत्या स्वरूपाचे असेल, अशा सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला दिले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय अंतिम - सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांचा राजकीय लढा सुरू होता. दोन्ही गटाकडून पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा केला जात होता. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेल्या निर्णयानुसार पक्ष संदर्भात आणि पक्षाच्या चिन्ह संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगच निर्णय घेऊ शकेल. याबाबतचे सर्व अधिकार निवडणूक आयोगाला देण्यात आल्याचं घटनापीठाने स्पष्ट केलं होतं. त्यामुळे समता पक्षाने केलेल्या दावा केंद्रीय निवडणूक मान्य करेल असं वाटत नाही.

समता पक्षाला आक्षेपाचा अधिकार नाही - केंद्रीय निवडणूक आयोगाने समता पक्षाचा चिन्ह मशाल हे गोठवलं आहे. त्यानंतरच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्या पक्षाला निशाणी मशाल हे दिलं आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाला समता पक्षाला आव्हान देता येणार नाही. तसंच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात समता पक्ष न्यायालयात गेले तरी, तिथे न्यायालय त्यांची बाजू ऐकून घेईल अशी शक्यता कमी असल्याचे मत, घटनातज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांच्या विरोधात निकाल दिल्यास ते कोणत्याही न्यायालयात जाऊ शकतील. मात्र न्यायालयातही त्यांचा दावा टिकणार नाही, असेही मत उल्हास बापट यांनी व्यक्त केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.