ETV Bharat / city

महाराष्ट्र ठरतोय कोरोना मृत्यूची राजधानी! देशापेक्षा राज्याचा मृत्यूदर दीड पटीने अधिक - corona situation in maharashtra

मध्यंतरी राज्यात मृत्यू पावलेल्या १८१ कोरोना रुग्णांचा अभ्यास करण्यात आला होता. यामध्ये लक्षणे दिसल्यानंतर उशीरा रुग्णालयात आल्यामुळे रुग्णांचा मृत्यूंचे प्रमाण अधिक दिसून आले होते. या कोरोना मृत्यूंमध्ये जवळपास १३० रुग्णांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त आढळून आले. तब्बल ७६ टक्के रुग्णांना मधुमेह, उच्चरक्तदाब यांसारखे आजार होते. तर लक्षणे दिसून आल्यानंतर सरासरी ६ ते ७ दिवसात बहुतांश रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

corona death
कोरोना मृत्यू
author img

By

Published : Aug 17, 2020, 6:14 PM IST

Updated : Aug 17, 2020, 8:18 PM IST

मुंबई - राज्यासह संपूर्ण जगच कोरोना विषाणूच्या संकटाने व्यापले आहे. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशात गेल्या २४ तासात कोरोनाच्या रुग्ण संख्येत ६३ हजार ४९० ची भर पडली असून याच काळात ९४४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण कोरोनाबळींची संख्या ४९ हजार ९८० वर पोहोचली आहे. विविध राज्यांनी आकडेवारी जाहीर केल्यानंतर देशातील एकूण कोरोनाबळींच्या संख्येने ५० हजारांचा टप्पा पार केला आहे. त्यातील २० हजार ३७ बळी एकट्या महाराष्ट्रातील असल्याने राज्य सरकारच्या चिंतेत भर पडली आहे.

देशभरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या २५ लाख ८९ हजार ६८२ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांमध्ये ५३ हजार ३२२ रुग्ण बरे झाले असून एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १८ लाख ६२ हजार २५८ झाली आहे. सध्या ६ लाख ७७ हजार ४४४ रुग्ण उपचाराधीन आहेत. तर रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण आता ७२ टक्क्यांवर गेले आहे. देशभरात सुमारे ३ कोटी नमुना कोरोना चाचण्या झाल्या असून, गेल्या २४ तासांमध्ये ७ लाख ४६ हजार चाचण्या करण्यात आल्या. राज्यातही गेल्या २४ तासात कोरोनाचे ११ हजार १११ रुग्ण आढळले. दिवसभरात २८८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या आता ५ लाख ९५ हजार ८६५ झाली आहे. देशात रुग्णवाढ सुरूच असली तरी मृत्युदर उत्तरोत्तर घटत आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाचे वाढते रुग्ण आणि मृत्यू संख्या ही राज्य सरकारपुढे चिंता वाढवणारी बाब...

हेही वाचा - #Monsoon2020 : देशभरात पाणीच पाणी... महाराष्ट्रातही अलर्ट जारी!

देशातील कोरोनाबळींचे प्रमाण १.९३ टक्के आहे. देशात १५६ दिवसांत मृतांचा आकडा ५० हजारांवर गेला आहे. हा आकडा अमेरिकेत २३ दिवसात तर ब्राझीलमध्ये ९५ दिवसांत पार झाला होता. महाराष्ट्रात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ३१ लाख ६२ हजार ७४० नमुन्यांपैकी ५ लाख ९५ हजार ८६५ नमुने पॉझिटिव्ह (१८.८४ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ५३ हजार ८९७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३८ हजार २०३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत २०,०३७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३६ टक्के एवढा आहे.

मध्यंतरी राज्यात मृत्यू पावलेल्या १८१ कोरोना रुग्णांचा अभ्यास करण्यात आला होता. यामध्ये लक्षणे दिसल्यानंतर उशीरा रुग्णालयात आल्यामुळे रुग्णांचा मृत्यूंचे प्रमाण अधिक दिसून आले होते. या कोरोना मृत्यूंमध्ये जवळपास १३० रुग्णांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त आढळून आले. तब्बल ७६ टक्के रुग्णांना मधुमेह, उच्चरक्तदाब यांसारखे आजार होते. तर लक्षणे दिसून आल्यानंतर सरासरी ६ ते ७ दिवसात बहुतांश रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता आणि मुंबईतील मोठ्या पालिका रुग्णालयाचे माजी संचालक डॉ. अविनाश सुपे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मुंबई महानगर क्षेत्रात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची कारणमीमांसा करण्यासाठी अभ्यास केला. डॉ. अविनाश सुपे म्हणतात, "लक्षणे दिसून आल्यानंतर उशिरा रुग्णालयात पोहोचल्याने बहुतांश रुग्णांचा मृत्यू झाल्याचे या प्राथमिक अभ्यासात समोर आले आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर शून्य ते दोन दिवसात (०-२) मृत्यू होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. याचे कारण म्हणजे हे रुग्ण शेवटच्या टप्प्यात, अतिगंभीर परिस्थितीत रुग्णालयात दाखल झाले. लक्षणे दिसून आल्यानंतर सरासरी रुग्णांचा मृत्यूपर्यंतचा कालावधी ६ ते ७ दिवसांचा असल्याची माहिती आहे."

हेही वाचा - संजय राऊतांप्रमाणेच तुमचीही डॉक्टरांबाबत हीच भूमिका आहे का? मार्डचा मुख्यमंत्र्यांना सवाल

डॉ. सुपे यांच्या म्हणण्यानुसार लोकांनी आणि खास करून वयस्कर व्यक्तींनी, मधुमेह-उच्चरक्तदाब असलेल्या रुग्णांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी धोक्याचे संकेत वेळीच ओळखले पाहिजेत. धोक्याचे कोणते संकेत ओळखताना रुग्णाने शांत बसले असताना श्वास घेण्यास खूप त्रास होणे, हृदयाचे ठोके एका मिनिटात ९० पेक्षा जास्त होणे (वैद्यकीय भाषेत याला Tachycardia असे म्हणतात), शरीरातील ऑक्सिजनची मात्रा ९० टक्क्यांपेक्षा कमी होणे (Oxymeter) ने शरिरातील ऑक्सिजनची मात्रा ओळखता येवू शकते, ओठ निळे पडण्यास सुरूवात होणे. "लोकांनी वेळीत धोक्याचे संकेत ओळखले आणि कोविड-19 च्या रुग्णांवर उपचारासाठी असलेल्या रुग्णालयात दाखल झाले तर, जास्तीत-जास्त रुग्णांचा जीव वाचवता येणे शक्य होईल. मात्र, यासाठी लोकांनी वेळीच धोका ओळखून रुग्णालयात पोहोचले पाहिजे," असे डॉ. सुपे पुढे म्हणाले.

राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल होवून शून्य (०) ते २ दिवसात मृत्यू होणाऱ्यांची संख्या ८० असून लक्षणं दिसू लागल्यानंतर ३ ते ५ दिवसात मृत्यू जवळपास ८४ आहेत. तर रुग्ण उशिरा रुग्णालयात आल्यामुळे वैद्यकीय उपचार वेळीच करता आले नाहीत (Early Intervention was not posible) लक्षणे दिसून आल्यानंतर तीन दिवसात रुग्णालयात दाखल झालेल्यांचे मृत्यू कमी दिसून आले आहे.

राज्याच्या आरोग्य संचलनालयाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, "कोरोनाग्रस्त रुग्णांची लवकरात लवकर ओळख पटवणे. रुग्णांना तात्काळ कोविड-१९ रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करणे. कोविड-१९ रूग्णालयात सुसज्ज उपचारपद्धती आणि मनुष्यबळ याबाबत समितीने शिफारस केली आहे. या अहवालावर सरकार पुढील कारवाई करत आहे.

हेही वाचा - कोरोनामुळे राज्यात 126 पोलिसांचा मृत्यू, तर 9929 पोलीस कोरोनामुक्त

समितीने केलेल्या शिफारसीमधे रुग्णांची कॅटेगरी ठरवून रिस्क प्रोफोईल समजून घेवून रुग्णांना कोविड-१९ किंवा कोविड-१९ हेल्थ सेंटरमध्ये दाखल करण्यात यावे, हाय रिस्क रुग्णांनी कोणत्या रुग्णालयात जावे, त्यांच्यासाठी बेड कोणता याबाबत सेंट्रल हॉटलाईनच्या मदतीने व्यवस्था करावी. जेणेकरून रुग्ण एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात फिरणार नाहीत, याची दक्षता घेण्यास सांगितले आहे. तब्येत चांगली होत असताना अचानक मृत्यू पावलेले रुग्णांची संख्या फार कमी आहे. मात्र, काही रुग्ण उपचारांना साथ देत असतानाच अचानक या रुग्णांची तब्येत खालावून त्यांचा मृत्यू झाला. याबाबतही तपास आरोग्य विभागाकडून सुरु आहे.

मुंबईच्या लीलावती रुग्णालयातील छाती विकार तज्ज्ञ डॉ. जलिल परकार यांच्या अनुभवानुसार त्यांच्याकडे उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांचा असा अचानक मृत्यू झाला. हे रुग्ण उपचारांना साथ देत होते. व्हेंटिलेटरची गरज कमी झाली होती. तब्येत सुधारत होती. आम्ही ही लढाई जिंकणार असे वाटत असताना मात्र, ८-९ दिवसांनी अचानक या रुग्णांचा मृत्यू झाला. याला "कोविड स्टॉर्म" असे म्हणतात. परदेशातही अशा प्रकारे रुग्णांचे मृत्यू झाले आहेत."

हेही वाचा - शरद पवारांच्या 2 सुरक्षारक्षकांना कोरोना, संपूर्ण पवार कुटुंबीय क्वारंटाइन होण्याची शक्यता

मार्च महिन्यात महाराष्ट्रात पहिल्या कोरोनाग्रस्त रुग्णाची नोंद झाली. राज्यात एप्रिलच्या सुरूवातीला मृत्यूदर ७ टक्के होता. मात्र, मे महिन्यात राज्यातील मृत्यूदर ४.४ टक्क्यांवर आला होता, तर आता ३.३६ टक्के झाला आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, "सद्य स्थितीला राज्यातील मृत्यूदर ३.३६ टक्के आहे. एप्रिलच्या सुरूवातीच्या तुलनेत मृत्यूदर कमी झाला. २६९ कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचं विश्लेषण केल्यानंतर ५० वर्षाखालील व्यक्तींचा मृत्यूदर कमी झाल्याचे आढळून आले आहे. तर, २१ ते ३० वर्ष वयोगटातील व्यक्तींचा मृत्यूदर ०.६४ टक्के आहे. मात्र, ६१ ते ७० वयोगटातील व्यक्तींचा मृत्यूदर १७.७८ टक्के आहे."

"राज्यातील मृत्यूदर कमी होणे ही चांगली गोष्ट आहे. एप्रिलच्या सुरूवातीच्या तुलनेत राज्याची आरोग्यव्यवस्था अधिक बळकट झाली आहे. कोविड-१९ रुग्णालये, कोविड-१९ हेल्थ सेंटर सुरू झाली आहेत. रुग्णांची तपासणीदेखील वाढली आहे. त्यामुळे ८ टक्क्यांपर्यंत पोहोचलेला कोरोनाग्रस्तांचा मृत्यूदर आता ३.३६ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. कोरोना मृत्यूच्या कारणांचा अभ्यास करून राज्यातील मृत्यूदर आणखी कसा कमी करता येईल, याबाबत उपाययोजना करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मृत्यूच्या कारणांमुळे डॉक्टरांना रुग्णांवर योग्य पद्धतीने लक्ष ठेवता येईल. यासाठी येणाऱ्या दिवसात मृत्यूच्या कारणांचा सखोल अभ्यास केला जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - भारत कोरोनाचे जागतिक केंद्र बनण्याच्या उंबरठ्यावर

राज्यातील जिल्हानिहाय कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील :

  • मुंबई : बाधीत रुग्ण- (१,२७,७१६) बरे झालेले रुग्ण- (१,०२,७४९), मृत्यू- (७०८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३००), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७,५८१)
  • ठाणे : बाधीत रुग्ण- (१,१२,६३८), बरे झालेले रुग्ण- (८९,७९५), मृत्यू (३३००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९,५४२)
  • पालघर : बाधीत रुग्ण- (२०,२४३), बरे झालेले रुग्ण- (१३,९८१), मृत्यू- (४७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५७८४)
  • रायगड : बाधीत रुग्ण- (२३,००४), बरे झालेले रुग्ण-(१७,३२०), मृत्यू- (५७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५११०)
  • रत्नागिरी : बाधीत रुग्ण- (२७५४), बरे झालेले रुग्ण- (१५८२), मृत्यू- (१००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०७२)
  • सिंधुदुर्ग : बाधीत रुग्ण- (५७२), बरे झालेले रुग्ण- (४०८), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५२)
  • पुणे : बाधीत रुग्ण- (१,२७,५१८), बरे झालेले रुग्ण- (८३,३०८), मृत्यू- (३१३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१,०८०)
  • सातारा : बाधीत रुग्ण- (७१८८), बरे झालेले रुग्ण- (४३०९), मृत्यू- (२१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६६२)
  • सांगली : बाधीत रुग्ण- (६०८०), बरे झालेले रुग्ण- (३४९१), मृत्यू- (१९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३९३)
  • कोल्हापूर : बाधीत रुग्ण- (१३,३८४), बरे झालेले रुग्ण- (६२६९), मृत्यू- (३३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६७७६)
  • सोलापूर : बाधीत रुग्ण- (१४,०३३), बरे झालेले रुग्ण- (८३३६), मृत्यू- (६२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (५०७६)
  • नाशिक : बाधीत रुग्ण- (२५,६६२), बरे झालेले रुग्ण- (१५,९३६), मृत्यू- (६६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९०६६)
  • अहमदनगर : बाधीत रुग्ण- (१२,५२२), बरे झालेले रुग्ण- (८७७८), मृत्यू- (१२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६१५)
  • जळगाव : बाधीत रुग्ण- (१७,३३९), बरे झालेले रुग्ण- (११,८०२), मृत्यू- (६७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८३६)
  • नंदुरबार : बाधीत रुग्ण- (११७६), बरे झालेले रुग्ण- (७५४), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६९)
  • धुळे : बाधीत रुग्ण- (५१३४), बरे झालेले रुग्ण- (३२८०), मृत्यू- (१४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७०८)
  • औरंगाबाद : बाधीत रुग्ण- (१८,३३३), बरे झालेले रुग्ण- (१२,००१), मृत्यू- (५७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५७६२)
  • जालना : बाधीत रुग्ण-(३००२), बरे झालेले रुग्ण- (१७६९), मृत्यू- (११३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११२०)
  • बीड : बाधीत रुग्ण- (२५४४), बरे झालेले रुग्ण- (७६५), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (१७२१)
  • लातूर : बाधीत रुग्ण- (४९८२), बरे झालेले रुग्ण- (२२५४), मृत्यू- (१८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५४०)
  • परभणी : बाधीत रुग्ण- (१३९१), बरे झालेले रुग्ण- (५३१), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८०९)
  • हिंगोली : बाधीत रुग्ण- (९७८), बरे झालेले रुग्ण- (६४८), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०८)
  • नांदेड : बाधीत रुग्ण- (३८२७), बरे झालेले रुग्ण (१७१६), मृत्यू- (१३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९७७)
  • उस्मानाबाद : बाधीत रुग्ण- (३४३२), बरे झालेले रुग्ण- (१६६२), मृत्यू- (९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६८०)
  • अमरावती : बाधीत रुग्ण- (३४४२), बरे झालेले रुग्ण- (२२४७), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११००)
  • अकोला : बाधीत रुग्ण- (३२२९), बरे झालेले रुग्ण- (२५७३), मृत्यू- (१३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१८)
  • वाशिम : बाधीत रुग्ण- (११६३), बरे झालेले रुग्ण- (७३०), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१२)
  • बुलढाणा : बाधीत रुग्ण- (२३०२), बरे झालेले रुग्ण- (१३४९), मृत्यू- (६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८९२)
  • यवतमाळ : बाधीत रुग्ण- (२००९), बरे झालेले रुग्ण- (१२३९), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७२२)
  • नागपूर : बाधीत रुग्ण- (१२,८७३), बरे झालेले रुग्ण- (४७२६), मृत्यू- (३४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (७८०२)
  • वर्धा : बाधीत रुग्ण- (३६४), बरे झालेले रुग्ण- (२११), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४२)
  • भंडारा : बाधीत रुग्ण- (४९२), बरे झालेले रुग्ण- (३१४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७४)
  • गोंदिया : बाधीत रुग्ण- (७६७), बरे झालेले रुग्ण- (४४९), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०९)
  • चंद्रपूर : बाधीत रुग्ण- (१०१८), बरे झालेले रुग्ण- (५५७), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५५)
  • गडचिरोली : बाधीत रुग्ण- (५१३), बरे झालेले रुग्ण- (३८२), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२९)

इतर : बाधीत रुग्ण- (५३८), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७९)

महाराष्ट्रातील एकूण :

बाधीत रुग्ण - ५ लाख ८४ हजार ७५४, बरे झालेले रुग्ण - ४ लाख ८ हजार २८६, मृत्यू - १९ हजार ७४९, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - ३१०, ॲक्टिव्ह रुग्ण - १ लाख ५६ हजार ४०९

Last Updated : Aug 17, 2020, 8:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.