ETV Bharat / city

Rana Couple राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होणार का, खार पोलिसांच्या अर्जावर 22 ऑगस्ट रोजी सत्र न्यायालय देणार निर्णय - Will Rana Couples Bail be Cancelled

उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा वाचण्याची घोषणा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दिल्यानंतर झालेल्या प्रकारानंतर खार पोलिसांनी राणा दाम्पत्य यांच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. यावेळी देण्यात आलेल्या जामीन अटीचा भंग केल्याने त्यांच्या जामीन रद्द करण्यात यावा याकरिता पोलिसांकडून अर्ज करण्यात आला होता. त्यावर दोन्हीही पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून, 22 ऑगस्ट रोजी मुंबई सत्र न्यायालय आपला निर्णय देणार आहे. Khar Police had Registered a Case MP Navneet Rana MLA Ravi Rana

Rana couple
राणा दाम्पत्य
author img

By

Published : Aug 12, 2022, 5:02 PM IST

मुंबई माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa ) वाचण्याचा अहवाल खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांनी दिल्यानंतर झालेल्या प्रकारानंतर खार पोलिसांनी राणा दाम्पत्य यांच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा ( Khar Police had Registered a Case ) दाखल केला होता. यावेळी देण्यात आलेल्या जामीन अटीचा भंग केल्याने त्यांच्या जामीन रद्द करण्यात यावा याकरिता पोलिसांकडून ( Shiv Sena Chief Uddhav Thackeray ) अर्ज करण्यात आला होता. त्यावर दोन्हीही पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून, 22 ऑगस्ट रोजी मुंबई सत्र न्यायालय आपला निर्णय देणार आहे.

राणा दाम्पत्याच्या अर्जावर सुनावणी : त्यामुळे राणादाम्पत्य यांच्यावर पुन्हा जेलमध्ये जाणार की, जामिनावर बाहेर राहणार की नाही हे स्पष्ट होणार आहे. जामिनाच्या अटीचा भंग केल्याने अपक्ष खासदार नवनीत राणा व अपक्ष आमदार रवी राणा या दाम्पत्याचा जामीन रद्द करावा, अशी विनंती करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होऊन ते पुन्हा गजाआड जाणार की, पोलिसांचा अर्ज फेटाळला जाणार हे 22 ऑगस्ट रोजी स्पष्ट होणार आहे.

मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा : महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा म्हणण्याच्या घोषणेने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याच्या आरोपाखाली राणा दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर राणा दाम्पत्यांना 23 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. आमदार-खासदारांविरुद्धच्या प्रकरणांची सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश रोकडे यांनी 4 मे रोजी राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर केला होता.

काय आहे न्यायालयाच्या अटी : माध्यमांशी बोलण्यास मज्जाव, दोघांना प्रत्येकी 50 हजार रुपये भरावे लागणार, पुराव्याशी छेडछाड केल्यास जामीन रद्द. ज्या कारणामुळे त्यांना अटक झाली ती कृती ते परत करू शकत नाहीत. तपास करणारा अधिकारी जेव्हा त्यांना चौकशीसाठी बोलवेल तेव्हा हजर राहावे लागेल. तपास अधिकाऱ्यालाही 24 तास आधी राणा दाम्पत्याला नोटीस देणे बंधनकारक आहे.

काय आहे प्रकरण सध्या राज्यात मशिदींवरील भोंगे, हिंदुत्व आणि हनुमान चालिसा यावरून राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याची घोषणा केली होती. राणा दाम्पत्याच्या घोषणेनंतर राज्यभरातून शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झाले, तर दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला.

राणांच्या घोषणेनंतर शिवसेना समर्थक संतप्त राणांच्या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शने केली. तसेच, दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता. तब्बल तीन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरूच होता. त्यानंतर अखेर पंतप्रधान मुंबईत येत असल्याने आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्यासाठी जाणार नसल्याचे राणा दाम्पत्याने व्हिडीओ जारी करीत सांगितले आणि या नाट्यावर पडदा पडला. पण त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली.

मुंबई पोलिसांकडून राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली : पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली होती. 13 दिवसानंतर त्यांना काही अटी व शर्तीवर मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी जाताना प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यामुळे त्यांचा जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली होती.

हेही वाचा Khodashi Dam कराडजवळचे ब्रिटिशकालीन खोडशी धरण ओव्हरफ्लो, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.